मुंबई : रेड बल्ब मूव्हीज आणि का का किंडल एंटरटेनमेंट निर्मित, अभिषेक जावकर दिग्दर्शित ‘ग्रे’ (Gray) हा चित्रपट 1 ऑक्टोबर रोजी झी5 प्रीमियरवर प्रदर्शित झाला आहे. एका खूप मोठ्या काळानंतर प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या या रहस्यमय थरारक अशा वेगळ्या धाटणीच्या मराठी चित्रपटाच्या विषयामुळे ‘ग्रे’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहे.
‘ग्रे’ चित्रपटात मुख्य भूमिकेत अल्पावधीतच आपल्या अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता वैभव तत्ववादी (Vaibhav Tatwawadi) असून तो ‘सिद्धांत’ या एका धर्मादिकारी नामक प्रामाणिक पीडब्ल्यूडी अधिकाऱ्यांच्या अमेरिकेतून परतणाऱ्या मुलाची भूमिका साकारत आहे. ‘ग्रे’ ही सिद्धांतच्या कुटुंबाच्या दुर्दैवी बदल्याची कथा आहे. वैभवने आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिका साकारल्या असल्या तरीही या चित्रपटातील ‘सिद्धांत’ ने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे.
या चित्रपटात वैभव तत्त्ववादी समवेत पल्लवी पाटील, मयुरी देशमुख, शरद पोंक्षे, अविनाश नारकर, पुष्कराज चिरपूटकर असे एकापेक्षा एक अव्वल कलाकार आपणांस ह्या चित्रपटात पाहायला मिळतात. अभिषेक जावकर आणि स्पृहा जोशी यांनी या चित्रपटाचे लेखन केलेले असून विजय भाटे आणि केवल वाळुंज यांच्या संगीताची जोड या चित्रपटास लाभली आहे. अभिषेक जावकर दिग्दर्शित ‘ग्रे’ ही प्रेमाची आठवण बनून राहणाऱ्या नात्यांना घातलेली बदल्याची आर्त साद प्रेक्षकांना झी5 प्रीमियरवर पाहता येणार आहे.
‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट 28 जुलै 2017 ला प्रदर्शित होता. नुकतीच या चित्रपटाला चार वर्षे पूर्ण झाल्याचं औचित्य साधून निर्मात्यांनी या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे आता अभिनेता वैभव तत्ववादी आणि अभिनेत्री पूजा सावंत ही जोडी पुन्हा एकत्र येणार आहे.
अतिशय हलकीफुलकी कथा, वैभव तत्ववादी, पूजा सावंत यांचा सुंदर अभिनय, उत्तम दिग्दर्शन आणि तांत्रिक बाजू, ‘हरवू जरा….’, ‘जानू जानू….’ अशी उत्तमोत्तम गाणी यांचा मिलाफ ‘भेटली तू पुन्हा’ या चित्रपटात झाला होता. प्रेक्षकांचा या चित्रपटाला उत्तम प्रतिसादही लाभला होता. आता सिक्वेलची घोषणा झाल्यानं प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे आता या चित्रपटाच्या कथेनं काय नवं वळण घेतलं आहे, यात अजून काय नवीन बघायला मिळणार आहे किंवा कोणती गाणी असणार आहेत हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
देवी सातेरी प्रॉडक्शन्स आणि स्वरूप स्टुडिओज या चित्रपटाची निर्मिती करणार असून गिरीश परब, आकाश पेंढारकर, सचिन नारकर आणि विकास पवार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर ‘भेटली ती पुन्हा 2’ या सिक्वेलद्वारे आजवर अनेक मालिकांचं दिग्दर्शन केलेले सुप्रसिद्ध दिग्दर्शक जयंत पवार हे सिनेदिग्दर्शक म्हणून या चित्रपटाद्वारे पदार्पण करत आहेत. ‘भेटली तू पुन्हा’ हा चित्रपट लिहिणारे संजय जमखंडी ‘भेटली ती पुन्हा 2’चं लेखन करत आहेत.
नागा चैतन्यशी घटस्फोट, अभिनेत्री समंथाने पुन्हा एकदा बदललं सोशल मीडियावरील नाव!