TDM | ऐकले का? भाऊराव कऱ्हाडेंचा ‘टीडीएम’ पुन्हा येतोय हो प्रेक्षकांच्या भेटीला, ‘या’ दिवशी होणार धमाका

| Updated on: May 16, 2023 | 10:34 PM

टीडीएम हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. टीडीएम या भाऊराव यांचा बहुचर्चित चित्रपट आहे. हा चित्रपट अगोदर 25 एप्रिल रोजी रिलीज झाला होता. मात्र, त्यानंतर चित्रपटाला थिएटर मिळाले नाही. आता परत एकदा हा चित्रपट धमाल करण्यासाठी येतोय.

TDM | ऐकले का? भाऊराव कऱ्हाडेंचा ‘टीडीएम’ पुन्हा येतोय हो प्रेक्षकांच्या भेटीला, या दिवशी होणार धमाका
Follow us on

मुंबई : भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी अनेक हिट चित्रपट आतापर्यंत प्रेक्षकांना दिले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या चित्रपटाला थेट राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला. मुळात म्हणजे भाऊराव कऱ्हाडे (Bhaurao Karhade)  यांचे चित्रपट हे वास्तविक जीवनातील समस्येवर आधारित असतात. गेल्या काही दिवसांपासून भाऊराव यांचा टीडीएम हा चित्रपट प्रचंड चर्चेत आहे. टीडीएम हा भाऊराव यांचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट. मात्र, रिलीज झाल्यानंतर अचानक चित्रपटाचे शो रद्द केले गेले. 25 एप्रिल रोजी हा चित्रपट (Movie)  रिलीज झाला होता. प्रेक्षकांचा उदंड असा प्रतिसाद मिळत असतानाच चित्रपटाचे थिएटर मिळत नव्हते.  नुकताच आता भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी टीडीएम (TDM) चित्रपटासंदर्भात अत्यंत मोठी घोषणा ही केलीये.

प्रेक्षकांसाठी अत्यंत आनंदाची बातमी असून भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी टीडीएम चित्रपट परत एकदा रिलीज करण्याचा निर्णय घेतलाय. आता 9 जूनपासून पुन्हा एकदा टीडीएम प्रदर्शित होणार. म्हणजेच काय तर परत एकदा टीडीएमचा धमाका थिएटरमध्ये होणार असून या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळत आहे.

महाराष्ट्र शाहीर आणि टीडीएम या दोन चित्रपटांना पुरेसे थिएटर सुरूवातीला मिळाले नव्हते आणि शो अचानक रद्द देखील करण्यात आले. पुरेसे थिएटर मिळत नसल्याने चित्रपटाचे प्रदर्शन हे अचानक थांबवण्यात आले होते. आता परत एकदा चित्रपट धमाकेदार कामगिरी करताना नक्कीच दिसणार आहे.

दिग्दर्शक भाऊसाहेब कऱ्हाडे हे चित्रपटाला थिएटर न मिळाल्याने थेट थिएटरमध्येच ढसाढसा रडताना देखील दिसले होते. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षकही भावूक झाल्याचे कुठेतरी बघायला मिळाले. आता परत एकदा नव्या जोमाने टीडीएम हा चित्रपट रिलीज केला जाणार आहे.

भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांचा बबन हा देखील चित्रपट यापूर्वी हिट ठरलाय. टीडीएम हा अत्यंत आगळ्यावेगळ्या चित्रपट आहे. टीडीएम या चित्रपटातून प्रेक्षकांचे फुल मनोरंजन होणार हे नक्कीच आहे. टीडीएम चित्रपटाच्या नावातच वेगळेपणा आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाच्या माध्यमातून हास्याची मेजवानी प्रेक्षकांना भेटणार आहे.

ज्यावेळी पहिल्यांदा या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले, त्यावेळी चित्रपटाच्या नावाची जोरदार चर्चा ही रंगताना दिसली होती. प्रेक्षक सतत टीडीएम काय आहे? हे विचारताना दिसत होते. भाऊराव नानासाहेब कऱ्हाडे यांनी पहिल्यांदा 2002 मध्ये इंदोरीकर महाराज यांच्या किर्तनामध्ये टीडीएम हा शब्द ऐकल्याचा खुलासा हा त्यांनी नुकताच केला आहे.