Dharmaveer: ‘धर्मवीर’च्या पडद्यामागचे किस्से; झी टॉकीजवर उलगडणार प्रसाद ओकच्या चित्रपटाची Success Story

| Updated on: Jun 15, 2022 | 5:13 PM

या यशोगाथेमध्ये चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचा आतापर्यंतचा प्रवास व अनुभव कथन केले आहेत. या यशोगाथेमध्ये कलाकार, तंत्रज्ञ यांचे अनुभव, पडद्यामागचे किस्से यांचा समावेश आहे.

Dharmaveer: धर्मवीरच्या पडद्यामागचे किस्से; झी टॉकीजवर उलगडणार प्रसाद ओकच्या चित्रपटाची Success Story
Dharmaveer
Image Credit source: Instagram
Follow us on

‘ठाण्याचा वाघ’ म्हणून ख्याती असलेले धर्मवीर आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या जीवनावर आधारलेला ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीत ‘माईलस्टोन’ ठरतोय. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिला. चित्रपटाला मिळालेल्या या प्रचंड प्रतिसादाची यशोगाथा रविवार 19 जून रोजी दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 6 वाजता झी टॉकीजवर (Zee Talkies) उलगडली जाणार आहे. चित्रपटाला मिळालेले तुफान यश साजरं करीत या अभूतपूर्व यशाला सलाम करण्याकरिता ‘धर्मवीर’ चित्रपटाची यशोगाथा तयार करण्यात आली आहे. या यशोगाथेमध्ये चित्रपटाच्या टीमने चित्रपटाचा आतापर्यंतचा प्रवास व अनुभव कथन केले आहेत. या यशोगाथेमध्ये कलाकार, तंत्रज्ञ यांचे अनुभव, पडद्यामागचे किस्से यांचा समावेश आहे.

‘धर्मवीर’ चित्रपटासाठी केलेली अपार मेहनत व हा चित्रपट कारकिर्दीला कसा नवं वळण देणारा ठरला हे यशोगाथेतून सांगताना, मराठी चित्रपटांच्या यशाचा मापदंड म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जाईल असं अभिनेता प्रसाद ओक आवर्जून नमूद करतो. आभाळाएवढं कर्तृत्व आणि व्यक्तिमत्त्व असलेला हा लोकनेता सर्वसामान्यांच्या मनात आजही जिवंत आहे, मला आणि माझ्या भूमिकेला मिळलेलं प्रेम त्याचीच पोचपावती असल्याचं ही तो सांगतो.

हे सुद्धा वाचा

पहा व्हिडीओ-

‘धर्मवीर’ आनंद दिघे यांचा एवढा मोठा जीवनप्रवास एका चित्रपटातून मांडणं खूप अवघड काम, पण हा सगळा घाट मी घातला आणि या कलाकृतीच्या मागे भक्कमपणे उभे राहण्याचं काम झी स्टुडिओजने केल्याने हे शिवधनुष्य पेलल्याचे निर्माते मंगेश देसाई सांगतात. राज्याचे नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम (उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आणि मोलाचे सहकार्य या चित्रपटाला लाभले. संगीताच्या माध्यमातून तो काळ आणि एवढया लोकप्रिय व्यक्तिमत्वाचा पट उलगडण्यासाठी संगीतकार म्हणून अविनाश-विश्वजीत, चिनार-महेश आणि नंदेश उमप यांनी संगीताची बाजू भक्कमपणे सांभाळली.