Happy Birthday Suresh Wadkar | सुरेश वाडकरांचा आवाज ऐकल्यावर खुद्द राज कपूर म्हणाले, ‘मी जिवंत असेपर्यंत माझ्या चित्रपटात तूच गाणी गाणार!’

| Updated on: Aug 07, 2021 | 8:51 AM

अशी अनेक गाणी असतात, जी ऐकल्यानंतर त्यातील आवाज हा आपल्या मनात अगदी घर करून राहतो. अशाच काही अवाजांपैकी एक आहे सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांचा आवाज... चित्रपटातील रोमँटिक गाणी असो वा देवाच्या दारी तल्लीन होण्यासाठीचं भजन, प्रत्येक प्रकारच्या गाण्यात सुरेश वाडकर यांचा आवाज चपखल बसतो.

Happy Birthday Suresh Wadkar | सुरेश वाडकरांचा आवाज ऐकल्यावर खुद्द राज कपूर म्हणाले, ‘मी जिवंत असेपर्यंत माझ्या चित्रपटात तूच गाणी गाणार!’
सुरेश वाडकर
Follow us on

मुंबई : अशी अनेक गाणी असतात, जी ऐकल्यानंतर त्यातील आवाज हा आपल्या मनात अगदी घर करून राहतो. अशाच काही अवाजांपैकी एक आहे सुरेश वाडकर (Suresh Wadkar) यांचा आवाज… चित्रपटातील रोमँटिक गाणी असो वा देवाच्या दारी तल्लीन होण्यासाठीचं भजन, प्रत्येक प्रकारच्या गाण्यात सुरेश वाडकर यांचा आवाज चपखल बसतो. आज (7 ऑगस्ट) सुरेश वाडकर आपला 65वा वाढदिवस साजरा करत आहेत. याच खास निमित्ताने आपण त्यांच्या आयुष्तील काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत…

सुरेश वाडकर एक अप्रतिम गायक आहेत. त्यांनी हिंदी, मराठी, भोजपुरी आणि कोकणी भाषांमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. ते शास्त्रीय संगीतात देखील कार्यरत आहेत.

वयाच्या अवघ्या 20 वर्षी कारकिर्दीची सुरुवात!

पद्मश्री सुरेश वाडकर यांनी वयाच्या अवघ्या 8व्या वर्षी संगीत प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. वयाच्या 20व्या वर्षी त्यांना “सूर श्रृंगार” या संगीत स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेत सर्वांनी त्यांच्या आवाजाचे खूप कौतुक केले. त्यांचा आवाज ऐकून तेथे उपस्थित असलेला प्रत्येकजण खूप प्रभावित झाला होता. त्यांच्यामध्ये संगीतकार रवींद्र जैन आणि जयदेव देखील होते.

त्यांच्या आवाजाने प्रभावित झालेल्या रवींद्रजींनी त्यांना आपला “पहेली” या चित्रपटामध्ये गाण्याची संधी दिली. सुरेशजींनी गायलेले पहिले हिंदी गाणे ‘वृष्टी पडे टापूर टूपूर…’ हे होते. रसिक प्रेक्षकांना देखील हे गाणे खूप आवडले. यानंतर जयदेवजींनी त्यांना ‘गमन’ चित्रपटात गानायची संधी दिली आणि त्यातील गीत ‘सीने में जलन आंखों में तूफ़ान सा क्यों है…’ ने त्यांना एक विशेष ओळख मिळवून दिली आणि त्यांनी लोकांच्या हृदयात आपले स्थान निर्माण केले. यानंतर, ‘ए जिंदगी गले लगा ले’, ‘मेघा रे मेघा रे’, ‘मैं हूं प्रेम रोगी’, ‘ओ प्रिया प्रिया’, ‘लगी आज सावन की’ अशी एकाहून एक उत्तम गाणी गायली.

आरके फिल्म्समधून फोन

एकदा आरके फिल्म्सकडून त्यांच्या ‘प्रेम रोग’ या चित्रपटासाठी सुरेश वाडकर यांना फोन आला. हा फोन ऐकताच ते लगेचच या चित्रपटाची गाणी गाण्यास तयार झाले. ते म्हणतात, मी आधीही सगळ्या चित्रपटांची गाणी गायचो, पण ‘प्रेम रोग’ने मला खरी ओळख मिळवीन दिली. या चित्रपटामुळे प्रत्येकाला कळले की, एक मराठी गायक आहे, जो हिंदी गाणी उत्तम गाऊ शकतो.

लक्ष्मीकांत यांनी केली शिफारस

या बद्दल बोलताना सुरेश वाडकर एक मुलखतीत म्हणाले होते की, ‘प्रेम रोग’ च्या आधी ‘रमण’च्या माझ्या गझल खूप प्रसिद्ध झाल्या. लोक मला थोडेसे ओळखत होते, पण ‘प्रेम रोग’ हा चित्रपट वेगळा होता. मला आठवतंय की, चित्रपट बनवला जात होता आणि राज कपूरजी गायक म्हणून नवीन आवाज शोधत होते. त्यावेळी मुकेशजी या जगात नव्हते आणि लक्ष्मीकांतजींनी ‘मेघा रे’ गाण्यात माझा आवाज ऐकला होता. त्यांनीच राज कपूरजींना माझी शिफारस केली आणि सांगितले की, त्याचा आवाज देखील खूप चांगला आहे. तुम्हीही एकदा फोन करून ऐकू शकता. त्यानंतर मी त्यांना जाऊन भेटलो. राज कपूर साहेबांनी संधी आणि आपल्या मुलासारखे प्रेम दिले, ते दिवस मी कधीच विसरणार नाही.’

आणि राज कपूर म्हणाले…

‘प्रेम रोग’ चित्रपटानंतर राज कपूर यांनी मला सर्वांसमोर सुरेशजींना सांगितले होते की, ‘जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत फक्त सुरेश वाडकर आणि लता मंगेशकर माझ्या सर्व चित्रपटांसाठी गाणी गातील.’ राज कपूर यांनी दिलेले वचन पाळलं, असं सुरेश वाडकर म्हणतात. 1982 च्या ‘प्रेम रोग’ चित्रपटात, सुरेश वाडकर यांनी सहा पैकी चार गाणी गायली होती. ज्यात ‘भवरें ने खिलाया फूल’, ‘में हूं प्रेमरोगी’, ‘मेरी किस्मत मैं तू नहीं शायद’ आणि ‘मोहब्बत है क्या चीज’ या गाण्यांचा समावेश होता. सर्वांनाच ही गाणी खूप आवडली होती.

(Happy Birthday Suresh Wadkar when showman Raj Kapoor said You will sing in my film as long as I live)

हेही वाचा :

‘मला आजही मनासारखे चित्रपट मिळतात’, अभिनेत्री निशिगंध वाड यांनी व्यक्त केला आनंद!

…आणि अभिनेते मिलिंद शिंदे थोडक्यात बचावले! प्रसंगावधानामुळे टळली ‘जयंती’च्या सेटवरची दुर्घटना