…म्हणून मराठी कलाकार ग्रेट आहेत, लग्नानंतरची पहिली दिवाळी, ‘दगडू’चं पत्नीसह स्पेशल व्यक्तींसोबत सेलिब्रेशन
प्रथमेश परब याने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लग्नानंतरची पत्नीसोबतची पहिली दिवाळी स्पेशल व्यक्तींसोबत सेलिब्रेट केल्याचं सांगितलं आहे. प्रथमेशने आपल्या सेलिब्रेशनचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
1 / 7
मराठी कलाकर हे जितके कलेत पारंगत आहेत, तितकेच ते माणूस म्हणूनही ग्रेट आहेत. अनेक मराठी कलाकारांच्या वागण्या-बोलण्यातूनही ते जाणवतं. मराठी कलाकारांच्या चांगल्या वागणुकीमुळे चाहते देखील त्यांच्यावर जीव ओवाळून टाकावा इतकं प्रेम करतात. 'टाईमपास' चित्रपट फेम प्रथमेश परब याने असंच एक सामाजिक भान जपणारं काम करुन समाजापुढे नवा आदर्श घालून दिला आहे.
2 / 7
प्रथमेश परब याने फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने लग्नानंतरची पत्नीसोबतची पहिली दिवाळी स्पेशल व्यक्तींसोबत सेलिब्रेट केल्याचं सांगितलं आहे. प्रथमेशने आपल्या सेलिब्रेशनचे फोटोदेखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्याचे फोटो आणि पोस्ट भागून अनेक चाहत्यांना आनंद झाला आहे. अनेकांकडून प्रथमेशच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.
3 / 7
"आयुष्यातील प्रत्येक पहिली गोष्ट ही कायम स्पेशल असते. त्यातून लग्नानंतरची पहिली दिवाळी म्हटलं तर ती अजून स्पेशल व्हायला हवी. म्हणूनच आम्ही हा दिवस स्पेशल करण्याचा प्रयत्न केला. Sec Day school, खारदांडा येथील मुलांसोबत. त्यांच्या चेहऱ्यावरचं गोड हसू, चेहऱ्यावरची प्रचंड सकारात्मकता, आपल्याकडे काहीतरी कमी आहे यापेक्षा आपल्याकडे काहीतरी वेगळं आहे आणि त्याचा सहजपणे केलेला स्वीकार त्यांच्या वागण्यातून दिसतो", असं प्रथमेश परब आपल्या पोस्टमध्ये म्हणाला.
4 / 7
"आपल्याकडे सगळं असून आपण लहानसहान गोष्टींची किती सहज तक्रार करतो ना? पण या मुलांकडे बघून जाणवतं, की तक्रार करण्यापेक्षाही, आयुष्यात कृतज्ञ राहण्यासाठी बरीच कारणं आहेत, फक्त ती शोधता आली पाहिजेत", असं प्रथमेश म्हणाला.
5 / 7
"जेव्हा आम्ही या मुलांना भेटलो, तेव्हा काही जण म्हणाले , अरे peter भैय्या, काही म्हणाले, दगडू दादा, पण त्या व्यतिरिक्त कित्येक मुलांनी सिनेमा कधी बघितलाच नव्हता. त्यांच्यासाठी आम्ही होतो, आपल्यासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी आलेले एक ताई दादा आणि खरंतर तेच पुरेसं होतं", अशी भावना प्रथमेशने व्यक्त केली.
6 / 7
"या मुलांसाठी शाळेने एक स्पेशल दिवाळी बाजार आयोजित केला होता. मुलांनी, पणत्यांवर सुरेख पेटिंग केलं, छान छान ग्रीटिंग कार्ड्स बनवले, रांगोळीचे रंग पॅक केलं, त्यांची विक्री केली. बरं जितकं कौतुक या मुलांचं आहे, तितकंच त्यांच्या पालकांचं आणि शिक्षकांचं देखील आहे. सोनाली ताई तुमचं खूप खूप कौतुक आणि मनापासून आभार", असं प्रथमेश म्हणाला.
7 / 7
"दिवाळीच्या झगमगाटात, दिव्यांच्या लखलखटात, फटाक्यांच्या आतषबाजीत सुद्धा आज फार शांतता आणि प्रसन्नता जाणवतेय. तक्रारीच्या विचारांच वादळ pause झालंय आणि आयुष्याच्या रांगोळीत चैतन्यांचे रंग भरल्यासारखे वाटतं आहेत", अशा शब्दांत प्रथमेशने आपली भावना व्यक्त केली.