मुंबई : मराठीतील आघाडीचा अभिनेता सुबोध भावे (Subhodh Bhave) याने त्याच्या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यात त्याच्यामागे मायक्रोसॉफ्टचा (Microsoft) लोगो दिसत आहे. त्याच्या या फोटोला अनेकांनी लाईक केलंय. तर काहींनी यावर कमेंट करत आपली प्रतिक्रिया दिली आहे. या फोटोवरच्या काही कमेंट तर इतक्या भन्नाट आहेत की त्यााच स्क्रीनशॉट अनेकांनी आपल्या स्टेटसला ठेवला आहे. एकाने तर सुबोधला ते काम सोडण्याचा सल्ला दिला आहे.
अभिनेता सुबोध भावे हा त्याच्या अश्रुंची झाली फुले या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिकेत आहे. तिथे विविध शहरात त्याच्या या नाटकाचे प्रयोग हाऊसफुल होत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने तो तिथले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. नुकताच त्याने एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. यात त्याच्यामागे मायक्रोसॉफ्टचा लोगो दिसत आहे.याला त्याने ” नुकतंच मायक्रोसॉफ्ट जॉईन केलं… आमच्या कडे ‘विंडोज बसवून मिळतील”, असं कॅप्शन दिलं आहे. त्याच्या या फोटोला बारा हजारांहून अधिकांनी लाईक केलंय. तर अनेकांनी कमेंट केली आहे.
सुबोधच्या या मायक्रोसॉफ्टसोबतच्या फोटोवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. त्यातल्या त्याला काम सोडायला लावणाऱ्या कमेंटची भलतीच चर्चा आहे. “सर, तिथं अजिबात नाटकं केलेली चालत नाहीत. रोजच काम करावं लागेल. लगेच जॉब सोडा. तुमचं मन लागणार नाही. उगाच परत तुमच्या पहिल्या मार्केटिंगच्या जॉबसारखं व्हायचं”, अशी कमेंट एकाने केलीये. ज्याचे स्क्रीनशॉट सध्या व्हायरल होत आहेत. त्यावर सुबोधनेही हसण्याचे इमोजी शेअर करत आपली प्रतिक्रिया दिली आहे.
“आमचे येथे Apple खात खात Windows बसवून मिळतील “, अशी गमतीशीर कमेंट एका नेटकऱ्याने म्हटलंय. दुसऱ्याने “तुमच्या खिडक्यांचे काम कधी पूर्ण होणार? भारतातली तिकीट खिडकी तुमची आतुरतेने वाट बघत आहे!”, असं म्हटलं. “हा हा भारीच.. पण नको..विंडोज बसवणारे खूप जण मिळतील..तुमच्यासारखे अभिनय सम्राट फक्त तुम्हीच…”, असं एकाने म्हटलंय.
सुबोधला बायोपिकचा राजा म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळे त्याच्या एका चाहत्याने “पुढील चित्रपटात सुबोध भावे साकारणार बिल गेट्स!”, अशी कमेंट केली आहे. “आता अचानक मला तुमचा”Josh Talk”वरील video आठवला…एकंदरीत प्रवासा बद्दल बोलताना तुम्ही म्हटलं त्या नंतर मी एका software company मध्ये काम करत होतो”, अशी कमेंटही फोटोवर पाहायला मिळत आहे.
“मग आम्हला पण एक विंडो बसवून हवीच आहे आणि सोबत त्या विंडोज चा use कसा करावा ह्याचा tutorial सुद्धा हवाय, अशी एक भन्नाट कमेंट यावर पाहायला मिळत आहे.
संबंधित बातम्या