मुंबई : एबीजी शिपयार्ड लिमिटेड कंपनीचे (ABG Shipyard) माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल (Rishi Kamlesh Agrawal) यांनी केलेल्या घोटाळ्याची सध्या सर्वत्र जोरदार चर्चा आहे. 22 हजार 842 कोटींचा हा घोटाळा चर्चेचा विषय बनला आहे, अश्यात हा घोटाळा करुन कंपनीचे मालक पळून गेल्याचं बोललं जातंय. यावर मराठी दिग्दर्शक केदार शिंदे (Director Kedar Shinde) यांनी ट्विट करत आपलं मत मांडलं आहे. “22 हजार कोटी? म्हणजे नेमके किती शुन्य? एवढा बॅंक fraud करून त्या लोकांनी गुजरातमधून पलायन केलं. साधं घर घ्यायचं तर सामान्य माणसाला हे बॅंकवाले एवढं पेपरवर्क करायला लावतात. त्यात जे घर आहे ते पण तारण ठेवतात. नेमके अच्छे दिन आहेत कोणाचे?” असं केदार शिंदे म्हणाले आहेत.
केदार शिंदे यांचं ट्विट
22 हजार कोटींच्या घोटाळ्यावर केदार शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. “22 हजार कोटी? म्हणजे नेमके किती शुन्य? एवढा बॅंक fraud करून त्या लोकांनी गुजरातमधून पलायन केलं. साधं घर घ्यायचं तर सामान्य माणसाला हे बॅंकवाले एवढं पेपरवर्क करायला लावतात. त्यात जे घर आहे ते पण तारण ठेवतात. नेमके अच्छे दिन आहेत कोणाचे?” असं केदार शिंदे म्हणाले आहेत.
२२ हजार कोटी? म्हणजे नेमके किती शुन्य? एवढा बॅंक fraud करून त्या लोकांनी गुजरात मधून पलायन केलं. साधं घर घ्यायचं तर सामान्य माणसाला हे बॅंकवाले एवढं पेपरवर्क करायला लावतात. त्यात जे घर आहे ते पण तारण ठेवतात. नेमके अच्छे दिन आहेत कोणाचे?
— Kedar Shinde (@mekedarshinde) February 14, 2022
प्रकरण काय आहे?
एबीजी शिपयार्डने 28 बँकांना 22 हजार 842 कोटी रुपयांना गंडा घातला आहे. दरम्यान, रविवारी स्टेट बँक ऑफ इंडियाने कंपनीविरोधात तक्रार दाखल करून घेण्यात कोणताही निष्काळजीपणा झाला नसल्याचा दावा केला आहे.सीबीआयने कंपनीचे माजी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ऋषी कमलेश अग्रवाल यांच्यासह अनेक जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आयसीआयसीआय बँक 28 बँकांच्या संघाची मोट बांधण्यात आघाडीवर होती. दुसरे पाऊल आयडीबीआय बँकेने उचलले होते. मात्र तक्रार दिली ती एसबीआयने. नोव्हेंबर 2019 मध्ये भारतीय स्टेट बँकेने पहिल्यांदा या कंपनीविरोधात सीबीआयकडे तक्रार दाखल केली होती.
संबंधित बातम्या