‘खास रे’चे नवीन गाणे लाँच, आता महाराष्ट्रामध्ये ‘बेक्कार थंडी’ गाण्याचीच हवा!

| Updated on: Jan 12, 2022 | 10:39 AM

खास रे (Khas Re) संगीत आणि लेट्सअप मराठीच्या संयुक्त विद्यमाने बोचऱ्या थंडीत महाराष्ट्रातील प्रेक्षकांना याड लावण्यासाठी 'बेक्कार थंडी' (Bekkar Thandi) हे खास विंटर अँथम सॉंग लाँच करण्यात आले आहे. या अँथम सॉंगची प्रदर्शित होताच अवघ्या महाराष्ट्रात 'हवा' झाली असून खास रे च्या यंग ब्रिगेडने पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केलं आहे.

खास रेचे नवीन गाणे लाँच, आता महाराष्ट्रामध्ये बेक्कार थंडी गाण्याचीच हवा!
बेक्कार थंडी गाणे
Follow us on

मुंबई : खास रे (Khas Re) संगीत आणि लेट्सअप मराठीच्या संयुक्त विद्यमाने बोचऱ्या थंडीत महाराष्ट्रातील प्रेक्षकांना याड लावण्यासाठी ‘बेक्कार थंडी’ (Bekkar Thandi) हे खास विंटर अँथम सॉंग लाँच करण्यात आले आहे. या अँथम सॉंगची प्रदर्शित होताच अवघ्या महाराष्ट्रात ‘हवा’ झाली असून खास रे च्या यंग ब्रिगेडने पुन्हा एकदा आपले वेगळेपण सिद्ध केलं आहे.

खास रे संगीतचे नवीन गाणे लाँच

नेहमीच आपल्या वेगळ्या प्रयोगांसाठी प्रसिद्ध असण्याऱ्या ‘खास रे’ च्या शिलेदारांनी यंदाही आपला गावरान बाज जपला असून थंडीचं हे धमाल गाणं प्रेक्षकांसमोर आणले आहे. संतोष शिंदे यांनी ह्या व्हिडिओ गाण्याचे दिग्दर्शन केले आहे. तर संजय श्रीधर यांनी हे गाणे लिहिले असून त्यांनीच हे गाणे म्हटंले आहे. तर संदेश कालेकर यांनी हे गाणे संगीतबद्ध केलं आहे.

पुण्यातील एका छोट्याशा गावामध्ये शूटींग

पुण्यातील बोपगावमध्ये एका रात्रीत बोचणाऱ्या थंडीत या गाण्याचे शूटींग पूर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे गावातील ग्रामस्थांना या थंडीच्या अँथम सॉंगमध्ये अभिनय करण्याची संधी देण्यात आलीये. नरेंद्रकुमार फिरोदीया यांनी ह्या गाण्याची निर्मिती केली असून चालू घडामोडींवर मनोरंजनात्मक पद्धतीने भाष्य करण्याचं प्रयत्न ‘खास रे’च्या माध्यमातून आपण सातत्याने करत असल्याचं त्यांनी म्हंटलये..सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पारा घसरलाय. विशेष म्हणजे यंदा मुंबईमधेही प्रचंड थंडी आहे. त्यामुळेच थंडीवरील हे अँथम सॉंग करण्याचं ठरल्याचं नरेंद्र कुमार फिरोदिया यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

Bigg Boss 15 : शमिता शेट्टी बनली बिग बॉस 15 ची नवीन कॅप्टन, VIP नसलेल्या स्पर्धकांचेच घरामध्ये वर्चस्व!

अभिनेत्री जान्हवी कपूर कोरोनातून मुक्त, इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत दिली माहिती