Dharmaveer: ‘धर्मवीर’च्या संपूर्ण प्रवासावर प्रसाद ओकचं पुस्तक; ‘माझा आनंद’ होणार प्रकाशित

| Updated on: Aug 27, 2022 | 9:06 AM

प्रसादने साकारलेल्या धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमिकेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून तोंडभरून कौतुक झालं. प्रसादच्या करिअरमधील ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका ठरली. चित्रपटाचा हाच प्रवास तो आता पुस्तकाच्या रुपात वाचकांच्या भेटीला आणत आहे.

Dharmaveer: धर्मवीरच्या संपूर्ण प्रवासावर प्रसाद ओकचं पुस्तक; माझा आनंद होणार प्रकाशित
Dharmaveer: 'धर्मवीर'च्या संपूर्ण प्रवासावर प्रसाद ओकचं पुस्तक
Image Credit source: Instagram
Follow us on

प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ (Dharmaveer) हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला. आभाळाएवढं व्यक्तिमत्व अशी ओळख असलेल्या लोककारणी आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या या चरित्रपटात अभिनेता प्रसाद ओकने (Prasad Oak) मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हापासून त्याची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पहायला मिळाली. थिएटरमध्ये तुफान प्रतिसाद मिळाल्यानंतर ओटीटीवरही तो गाजला. प्रसादने साकारलेल्या धर्मवीर आनंद दिघेंच्या भूमिकेचं प्रेक्षक-समीक्षकांकडून तोंडभरून कौतुक झालं. प्रसादच्या करिअरमधील ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका ठरली. चित्रपटाचा हाच प्रवास तो आता पुस्तकाच्या रुपात वाचकांच्या भेटीला आणत आहे. ‘माझा आनंद’ या शीर्षकाचं पुस्तक त्याने लिहिलं असून या पुस्तकाचं प्रकाशन लवकरच पार पडणार आहे. प्रसादने इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करत याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली.

प्रसाद ओकची पोस्ट-

‘मा. दिघे साहेबांना विनम्र अभिवादन! लवकरच धर्मवीरच्या संपूर्ण प्रवासावर आधारित मी लिहिलेलं ‘माझा आनंद’ हे पुस्तक प्रकाशित होतंय. चित्रपटाइतकंच प्रेम पुस्तकावरसुद्धा कराल हीच आशा. जय महाराष्ट्र!,’ अशी पोस्ट प्रसादने लिहिली.

हे सुद्धा वाचा

“खोटी वाटावी इतकी खरी गोष्ट दिघेसाहेबांची आहे. ज्या उद्देशाने मंगेश देसाईने हा चित्रपट करण्याचं ठरवलं, की गुगलवर सर्च केल्यावर पहिलं सिंघानिया हॉस्पिटल आणि दिघे साहेबांबद्दल एक-दोन वाईट गोष्टी एवढंच येत. ते सगळं पुसलं जावं आणि त्यांचं महान कार्य, त्यांचं काम किती मोठं आहे हे लोकांसमोर यावं यासाठी हा चित्रपट केला. माझ्यासारख्या अभिनेत्याला 95 चित्रपटानंतर प्रमुख भूमिका साकारण्याची संधी या चित्रपटाच्या माध्यमातून मिळाली याचा मला फार आनंद आहे,” असं प्रसादने सांगितलं. ज्येष्ठ रंगभूषाकार विद्याधर भट्टे यांनी या चित्रपटातील कलाकारांचे लूक डिझाइन केले. या चित्रपटाला आणि त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयाला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं.