Chirag Patil: सेटवरच्या जेवणाविषयी चिरागने लढवली शक्कल; पाच दिवसांत बदलल्या क्रू मेंबर्सच्या सवयी

| Updated on: Apr 15, 2022 | 7:45 AM

चित्रपटाचं शूटिंग (Movie Shooting) म्हटलं की मोठमोठे सेट, लाईट्स, आणि अवजड उपकरणं. या सर्वांची उठाठेव करणं म्हणजे खूप मोठी अंगमेहनत. परिणामी सेटवर शारीरिक ताकद मिळण्यासाठी सर्वांसाठी पोटभर जेवणाची नेहमीच व्यवस्था असते. 'मराठी पाऊल पडते पुढे' या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मात्र हे चित्र थोडं वेगळं होतं.

Chirag Patil: सेटवरच्या जेवणाविषयी चिरागने लढवली शक्कल; पाच दिवसांत बदलल्या क्रू मेंबर्सच्या सवयी
Chirag Patil
Image Credit source: Instagram
Follow us on

चित्रपटाचं शूटिंग (Movie Shooting) म्हटलं की मोठमोठे सेट, लाईट्स, आणि अवजड उपकरणं. या सर्वांची उठाठेव करणं म्हणजे खूप मोठी अंगमेहनत. परिणामी सेटवर शारीरिक ताकद मिळण्यासाठी सर्वांसाठी पोटभर जेवणाची नेहमीच व्यवस्था असते. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान मात्र हे चित्र थोडं वेगळं होतं. या चित्रपटात मुख्य भूमिकेत असलेला अभिनेता चिराग पाटील (Chirag Patil) याने त्याच्या एका गोष्टीने संपूर्ण क्रूच्या जेवणाची सवयच बदलून टाकली. ‘मराठी पाऊल पडते पुढे’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या वेळी चिराग आवर्जून घरचा डबा आणायचा. हे रोजचं होऊ लागल्या कारणाने सेटवरील लोकांना या गोष्टीचं नवल वाटलं. तर काही दिवसांनी सेटवर “चिराग सेटवरचं जेवण जेवत नाही” या चर्चा रंगू लागल्या. ह्या चर्चा जेव्हा खुद्द चिरागच्या कानावर पडल्या तेव्हा त्याने एक शक्कल लढवायची ठरविली. (Food Habits)

सेटवर जेवण्याची सर्व्हिस देणाऱ्या केटरर्सला त्याने स्वतः भेटून पुढील पाच दिवस खाण्याचा सोडा, नॉन व्हेज, फूड कलर या गोष्टींशिवाय जेवण बनवायला सांगितलं. आता खुद्द सिनेमाचा नायकच आपल्याला सांगतो तर आपल्याला हे ऐकावंच लागेल असा विचार करत केटरर्सनी त्याचं म्हणणं ऐकलं आणि दुसऱ्या दिवसापासून हेल्दी जेवण सेटवर यायला लागलं. सुरुवातीला लोकांनी जेवणावर नाकं मुरडली. पण दुसऱ्या तिसऱ्या दिवसांपासून सर्वांनीच शाकाहारी जेवण आनंदाने खाण्यास सुरुवात केली.

काही मंडळींनी चिरागने असं का केलं असावं याचा पाठपुरावा करण्यासाठी थेट त्यालाच प्रश्न केला असता त्याने स्मितहास्य करत सांगितलं, “सेटवरच्या जेवणाला माझा कधीच विरोध नाही, पण कधी कधी जास्त क्वांटिटी असलेल्या जेवणात खाण्याचा सोडा मिसळला जातो. आता त्याचे परिणाम दिसत जरी नसले तरी त्याचे परिणाम आपल्या उतरत्या वयात नक्कीच दिसतात. त्यामुळे खाण्याचा सोडा न खाल्लेला बरा. शिवाय नॉन व्हेजचे अतिसेवनदेखील त्रासदायक असते. शाळेत असल्यापासून आईने बनवलेल्या घरच्या डब्याची माझी सवय कधीच सुटली नाही हे ही तितकंच खरं. म्हणून मी घरच्या पौष्टिक अन्नाला प्राधान्य देत आलेलो आहे आणि म्हणून मी जिथेही जातो तिथे माझ्यासोबत माझ्या घरचा डब्बा सोबतच असतो. कधी घरापासून लांब जास्त दिवसांच्या शूटिंगचा प्लॅन असेल तर आईने शिकवलेलं बेसिक कुकिंग त्यावेळी कामी येते. त्यामुळे बाहेरचं किंवा सेटवरचं जेवण खाणं मी शक्यतो टाळतो. माझ्यासोबत काम करत असलेल्या प्रत्येक व्यक्तीचा मला आदर आहे. शिवाय त्यांच्या तब्येतीचादेखील मी विचार करतो. असं केल्याने जर मी त्यांच्या खाण्याच्या सवयी सुधारत असतील तर माझ्या मते मी चांगलंच केलं असं वाटतंय.” पाच दिवसांच्या या पचनक्रियेला कमी ताण देणाऱ्या जेवणाने फ्रेशनेस वाढल्याच्या प्रतिक्रिया सेटवर नंतर ऐकायला मिळाल्या.

इन्स्टा पोस्ट-

चिराग पाटीलचा आगामी मराठी चित्रपट ‘मराठी पाऊल पडते पुढे’ मध्ये तो एक निर्भीड उद्योजकाची भूमिका साकारत आहे. मराठी माणसाने व्यवसाय क्षेत्रात उतरत आपली नवी ओळख बनवावी ही या चित्रपटाची कहाणी आहे. निर्माते प्रकाश बाविस्कर हे स्वतः यशस्वी मराठी उद्योजक असून चित्रपट निर्माते म्हणून हा त्यांचा पहिला चित्रपट आहे. तसंच चंद्रकांत विसपुते हे चित्रपटाचे सहनिर्माते असून स्वप्नील मयेकर हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी पाटणे चिरागसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. जेष्ठ अभिनेते अनंत जोग हे या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारत आहेत. तर अभिनेता संजय कुलकर्णी आणि अभिनेता सतीश सलागरे यांच्यादेखील उल्लेखनीय भूमिका आहेत.

हेही वाचा:

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नाचा सर्वांत हटके मेन्यू

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नात सेलिब्रिटींचा थाट, पहा फोटो