वृंदावन: मथुरेच्या खासदार आणि बॉलिवूडची ड्रिम गर्ल अर्थात अभिनेत्री हेमा मालिनी या सध्या राजकीय प्रवासावर लक्ष केंद्रीत करत आहेत. हेमा मालिनी यांना कामातून जेव्हा वेळ मिळतो, तेव्हा त्या भगवान भक्तीत लीन पहायला मिळतात. भाजप खासदार हेमा मालिनी नुकत्याच वृंदावनला पोहोचल्या होत्या. यावेळी त्यांनी राधारमण मंदिरात भजनसुद्धा गायलं. सोशल मीडियावर या भजन गायनाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओत त्या भजन गाताना दिसत आहेत.
हेमा मालिनी या शनिवारी वृंदावनला गेल्या होत्या. इथल्या राधारमण मंदिरात त्या कृष्ण भक्तीत लीन झाल्या. मंदिरात उपस्थित असलेल्या हजारो भक्तांसमोर त्यांनी शिक्षाष्टकम भजन गायलं. त्यांनी गायलेलं भजन ऐकताना भक्तसुद्धा कृष्णभक्तीत लीन झाले.
हेमा मालिनी यांनी जवळपास 30 मिनिटांत चार भजनं गायली. हेमा मालिनी यांची कृष्णभक्ती याआधीही पहायला मिळाली होती. सुरुवातीला त्यांनी ‘न राधा न मीरा हूँ, मै तो कृष्ण दिवानी हूँ’ हे भजन गायलं. तेव्हा त्यांच्यासोबत मंदिरात उपस्थित असलेले भक्तसुद्धा भजनात दंग झाले. त्यानंतर त्या हरे कृष्णा हरे कृष्णा हे भजन गुणगुणल्या.
#WATCH | Uttar Pradesh: Mathura MP and actress Hema Malini sang bhajan at Radha Raman Temple in Vrindavan yesterday. She also offered prayers here. pic.twitter.com/NpKIbNU9JQ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) January 15, 2023
हेमा मालिनी यांना अशा प्रकारे मंदिरात भजन गाताना पहिल्यांदाच पाहिलं गेलं. त्यांच्या या भजनादरम्यान टाळ्यांचा कडकडाटसुद्धा झाला आणि ‘राधा कृष्ण’चा जयजयकारही ऐकायला मिळाला. हेमा मालिनी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. भजन गाण्याआधी हेमा मालिनी यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं.