‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून चाहत्यांच्या मनावर राज्य करणारी मायरा वायकुळ कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील मायरा एक खास कारणामुळे चर्चेत आली आहे. मायरा हिने सोशल मीडियावर काही फोटो पोस्ट केले आहे. फोटो पोस्ट करत मायरा हिने आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. मयरा हिने फोटो पोस्ट करत खास गुपित चाहत्यांना सांगितलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मायरा वायकुळ हिच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चाल रंगली आहे.
मायरा हिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तीन फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. पहिल्या फोटोमध्ये मायरा हातात एक पाटी आहे. पाटीवर ‘माझ्याकडे एक गुपित आहे…’ असं लिहिलं आहे. दुसऱ्या फोटोमध्ये मायरा हिच्यासोबत तिचे आई – वडील देखील आहेत. दुसऱ्या फोटोमधील पाटीवर ‘मी आता लवकरच मोठी बहीण होणार आहे.’ असं लिहिलं आहे.
तर तिसऱ्या फोटोमधील पाटीवर वायकुळ कुटुंबात कधी नव्या बाळाचं आगमन होईल सांगितलं आहे. सप्टेंबर 2024 मध्ये मयरा मोठी ताई होणार आहे. सध्या मायरा हिची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मायरा हिची पोस्ट पाहिल्यानंतर चाहते तिचे आई-बाबा श्वेता आणि गौरव वायकुळ यांना शुभेच्छा देत आहेत.
मायरा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, फार कमी वयात मायरा यशात्या उच्च शिखरावर पोहोचली आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली मायरा प्रसिद्ध आणि लोकप्रिय बालकलाकारांच्या यादीत अव्वल स्थानी आहे. तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.
‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेनंतर ‘कलर्स टीव्ही’वरील ‘नीरजा: एक नयी पहचान’ या मालिकेत दिसली. छोट्या पडद्यावर स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर मायरा हिने सिनेमांमध्ये देखील काम करायला सुरुवात केली आहे. मायरा लवकरच ‘नाच गं घुमा’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमा 1 मे रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या सिनेमाची टीम सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.