Mika Singh Performance Anant Ambani Engagement: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे पूत्र अनंत अंबानी यांनी गुरुवारी गर्लफ्रेंड राधिका मर्चेंटसोबत साखरपुडा केला. राजस्थान येथील नाथद्वार येथील श्रीनाथजी मंदिरात अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा संपन्न झाला. राजस्थानमध्ये साखपुडा झाल्यानंतर अंबानी कुटुंबाच्या घरी रात्री उशीरापर्यंत जल्लोष सुरू होता. त्यांच्या साखपुड्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले.
अंबानी कुटुंबाच्या आनंदामध्ये अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. एवढंच नाही, तर या सोहळ्यामध्ये प्रसिद्ध गायक मीका सिंग (Mika Singh) ने दमदार सादरीकरण केलं. पण तुम्हाला माहिती आहे. अनंत अंबानी यांच्या साखपुड्यात गाणं गाण्यासाठी मिका सिंगने तब्बल कोट्यवधी रुपयांचा मानधन घेतलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मीका सिंगने साखरपुड्यात गाणं गाण्यासाठी तब्बल १.५ कोटी रुपये मानधन घेतलं आहे. थक्क करणारी गोष्ट म्हणजे मीकाने फक्त १० मिनिटं गाणं गाण्यासाठी १.५ कोटी रुपये मानधन घेतलं आहे. अशात मीकाची तुफान चर्चा रंगत आहे.
दरम्यान, राजस्थानमध्ये साखपुडा झाल्यानंतर अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट कुटुंबासोबत मुंबईतील राहत्या घरी एंटीला येथे पोहोचले. जेथे एका भव्य पार्टीचं आयोजन करण्यात आलं. रात्री उशीरापर्यंत ही पार्टी सुरु होती.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांच्या साखपुड्याच्या पार्टीमध्ये अनेक प्रसिद्ध सिलेब्रिटींनी हजेरी लावली. सलमान खान, शाहरुख खान, रणबीर कपूर, आलिया भट्ट कपूर… यांसारख्या अनेक सेलिब्रिटी आंबानींच्या घरी पर्टीसाठी आले. त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.