मुंबई : शाहिद कपूर आणि मीरा राजपूत (Mira Rajput) हे बाॅलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेले कपल आहे. शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे लग्न 2015 मध्ये पंजाबी पध्दतीने झाले आहे. विशेष म्हणजे शाहिद कपूर याच्यापेक्षा मीरा राजपूत ही तब्बल 13 वर्षांनी लहान आहे. लग्नामध्ये मीरा राजपूत हिचे फक्त 21 वर्षे वय होते. मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांची पहिली भेट ज्यावेळी शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा उडता पंजाब चित्रपटाचे शूटिंग करत होता, त्यावेळी झाली होती. पहिल्यांदाच शाहिद कपूर याला प्रत्यक्षात पाहून मीरा राजपूत हिला धक्काच बसला होता. कारण चित्रपटासाठी (Movie) शाहिद कपूर याने दाढी वाढवली होती आणि त्याच लूकमध्ये शाहिद हा मीराला भेटण्यासाठी गेला होता.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांची लव्ह स्टोरी अत्यंत खास आहे. मीरा राजपूत ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. विशेष म्हणजे मीरा राजपूत हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. मीरा राजपूत आणि शाहिद कपूर हे काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वरळीतील आलिशान घरात शिफ्ट झाले आहेत.
मीरा राजपूत हिने काही दिवसांपूर्वीच तिच्या वरळीच्या घरातील काही खास फोटो हे शेअर केले होते. कोट्यावधीच्या आसपास मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांचे वरळीमधील घर आहे. आज मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांच्या लग्नाला तब्बल 8 वर्षे पूर्ण झाली आहेत. मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांनी खास पोस्ट या सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.
शाहिद कपूर याने खास ॉफोटो शेअर करत मीरा लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मीराने देखील एक कॅप्शन देत लिहिले की, चादण्याच्या आकाशात, मी तुला माझे हृदय दिले… पुढे जा आणि तोडून टाक… तू फक्त माझ्यामध्ये स्वतःला शोधशील (प्लीज मला मारू नको कारण मी तुझ्या फेवरेट म्यूजिकचे वर्जन बनविली आहे)
मीरा राजपूत आणि शाहिद कपूर यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करून यांना लग्न वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीमध्ये मीरा राजपूत हिने म्हटले होते की, मला स्टारकिड्स या शब्दाचा प्रचंड असा राग येतो. यानंतर अनेकांनी मीरा हिच्यावर टिका करण्यासही सुरूवात केली होती.