‘मिर्झापूर सीझन 3’ 5 जुलै रोजी प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आहे. ‘मिर्झापूर’ सीरिजच्या पहिल्या दोन सीझनला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. आता सीरिजच्या तिसऱ्या सीझनला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. काहीजण कालीन भैय्याचं कौतुक करत आहेत तर काही, मुन्ना भैय्याला इतकं आठवत आहेत की अनेकांना सीरिज आवडली नाही. तिसऱ्या सीझनमध्ये काही रहस्य समोर आली आहेत, तर घटना घडल्या आहेत. तिसरा सीझन रटाळ असल्याची प्रेक्षकांचं म्हणणं आहे.
‘मिर्झापूर सीझन 3’ च्या सुरुवातीलाच मुन्ना भैय्या याचं निधन झाल्याचं दाखवण्यात आलं आहे. त्याचा मृतदेह तिथे ठेवण्यात आला आहे, मुन्ना भैय्या याचं निधन झाल्याचं पाहिल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसतो. तर पूर्ण सीझनमध्ये कालीन भैय्या एका शोपीससारखा असल्याचं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तर सीझनमधील सातवा एपिसोड प्रेक्षकांना बिलकूल आवडलेला नाही. तर तिसऱ्या सीझममध्ये काम करण्यासाठी कोणाला किती मानधन मिळालं आहे. याची देखील चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्री रसिका दुग्गल हिने सीरिजमध्ये बीना त्रिपाठी या भूमिकेला न्याय दिला आहे. सीरिजच्या प्रत्येक एपिसोडसाठी अभिनेत्रीला 2 लाख रुपया मानधन मिळालं आहे. म्हणजे 10 एपिसोडसाठी अभिनेत्रीला 20 लाख रुपये मानधन मिळालं आहे.
सीरिझमध्ये गुड्डू पंडित या भूमिकेत दिसलेल्या अभिनेता अली फजल याला एका एपिसोडसाठी 12 लाख रुपये म्हणजे 10 एपिसोडसाठी 1,20,00000 रुपये मानधन मिळालं आहे. सांगायचं झालं तर, सीरिजमध्ये अभिनेता जितेंद्र कुमार याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे. ‘पंचायत 2’च्या एका एपिसोडसाठी अभिनेत्याने 4 लाख रुपये मानधन घेतलं होतं. तरअ तिसऱ्या सीझनसाठी त्याने स्वतःची फी वाढवली असल्याची माहिती देखील समोर आली.
मीडिया रिपोर्टनुसार, ‘मिर्झापूर 2’ साठी अभिनेते पंकज त्रिपाठी यांनी 2 ते 10 कोटी मानधन मिळालं होतं. यावेळी त्यांच्या मानधनात वाढ झाल्याची माहिती देखील मिळत आहे. पण पंकज यांनी किती मानधन मिळालं याबद्दल माहिती समोर आलेली नाही. तर गोलीच्या भूमिकेत दिसणाऱ्या अभिनेत्री श्वेता त्रिपाठी हिला 2.20 लाख रुपये एका एपिसोडसाठी देण्यात आलं आहे. म्हणजे 10 एपिसोडसाठी 22 लाख रुपये श्वेता हिला मानधन मिळालं आहे.