‘मिर्झापूर’ सीरिज नाही सिनेमा येणार चाहत्यांच्या भेटीस, टीझर पाहून व्हाल थक्क

| Updated on: Oct 28, 2024 | 12:12 PM

Mirzapur The Film: 'गद्दी का महत्त्व तो आप जानते ही हैं, सन्मान.... पॉव्हर... कंट्रोल...', मोठ्या पडद्यावर राज्य करण्यासाठी 'मिर्झापूर' सिनेमा सज्ज... टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांच्या मनात सिनेमाची उत्सुकता पोहोचली शिगेला...

मिर्झापूर सीरिज नाही सिनेमा येणार चाहत्यांच्या भेटीस, टीझर पाहून व्हाल थक्क
Follow us on

Mirzapur The Film: ‘मिर्झापूर’ सीरिजच्या तिन्ही भागांनी चाहत्यांचं भरभरुन मनोरंजन केलं. अभिनेते पंकज त्रिपाठी अभिनेता अली फजल आणि दिव्येंदु शर्मा यांसारख्या कलाकारांमुळे सीरिजला चाहत्यांना डोक्यावर घेतलं. सत्ता, राजकारण आणि गादी… भोवती फिरत असलेल्या सीरिजची कथा आता चाहत्यांना छोट्या पडद्यावर नाही तर, मोठ्या पडद्यावर अनुभवता येणार आहे. म्हणजे ‘मिर्झापूर’ सिनेमा लवकरच चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सिनेमाचा टीझर आला प्रदर्शित झाला आहे.

सिनेमाचा टीझर सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. टीझरमध्ये कालीन भैय्या, गुड्डू पंडित आणि मुन्ना भैय्या यांची दादागिरी पाहायला मिळत आहे… टीझरच्या सुरुवातील ‘गद्दी का महत्त्व तो आप जानते ही हैं, सन्मान…. पॉव्हर… कंट्रोल…’ असं म्हणत एन्ट्री रिस्क आहे असं सांगतात. पुढे गुड्डू भैय्याची एन्ट्री होते आणि अभिनेता म्हणतो ‘रिस्क लेना हमारी यूएसपी है|’ टीझरमधील दमदार डायलॉगमुळे सिनेमासाठी चाहत्यांच्या मनातील उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

हे सुद्धा वाचा

 

 

पुढे मुन्ना भैय्या म्हणजे अभिनेता दिव्येंदु शर्माची एन्ट्री होते आणि तो म्हणतो, ‘हिंदी फिल्म के हीरो हैं बे | बोले थे ना हम अमर हौ…’ सांगायचं झालं तर, सीरिझच्या तिसऱ्या सीझनमध्ये मुन्ना भैय्याचं निधन झाल्याचं दाखण्यात आलं होतं. पण सिनेमात मुन्ना भैय्याची दमदार एन्ट्री उत्साह वाढवणारी आहे.

कधी प्रदर्शित होणार ‘मिर्झापूर द फिल्म’?

टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सर्वत्र फक्त आणि फक्त ‘मिर्झापूर द फिल्म’ सिनेमाची चर्चा रंगली आहे. सीनेमाचा टीझर इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहे. टीझर पोस्ट करत कॅप्शनमध्ये, ‘अब भौकाल भी बडा होगा और पर्दा भी… ‘मिर्झापूर द फिल्म’ लवकरच प्रदर्शित होत आहे.’

सिनेमाच्या टीझरवर चाहत्यांच्या कमेंटच्या माध्यमातून प्रतिक्रिया येत आहेत. टीझरनंतर चाहते ट्रेलर आणि सिनेमाच्या प्रतिक्षेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ‘मिर्झापूर द फिल्म’ सिनेमा 2026 मध्ये चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.