मुंबई | 9 ऑगस्ट 2023 : मॉडलिंग क्षेत्रात तरुणींना अनेक चांगल्या – वाईट गोष्टींचा सामना करावा लागतो. मॉडलिंग क्षेत्रात स्वतःची ओळख तयार करत असताना तरुणी अनेकांच्या जाळ्यात अडकतात. मॉडलिंग क्षेत्रात तरुणींना स्वतःला सिद्ध करून दाखवावं लागतं. स्वतःची एक आदर्श प्रतिमा सर्वांसमोर मांडावी लागते. एवढंच नाही तर, ती टिकवण्याची जबाबदारीही त्यांच्यावर असते. पण मॉडलिंग क्षेत्रातील एक कटू सत्य कोणापासूनही लपलेलं नाही. जगभरातील मॉडेल्सचा अनेक गोष्टींचा त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या असहायतेचा गैरफायदा घेतला जातो. असंच काही मिस युनिव्हर्स इंडोनेशिया स्पर्धेतून समोर आले आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
मिस युनिव्हर्स इंडोनेशियामध्ये सहभागी झालेल्या सहा मॉडेल्सनी लैंगिक छळाबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी सहा मॉडेल्सने शोच्या आयोजकांवर गंभीर आरोप केले आहेत. आयोजकांनी मॉडेल्सना अश्लील पोज देण्यासाठी आणि टॉपलेस पोज देण्यास भाग पाडल्याचं धक्कादायक सत्य समोर येत आहे.
आयोजकांनी शोमधील मॉडेल्सना २० लोकांसमोर टॉपलेस व्हायला सांगितलं आणि त्यांचे फोटो काढू लागले. आयोजकांनी मॉडेल्सची फसवणूक केली आणि अंतिम फेरीसाठी शरीर तपासणी करावी लागेल असे सांगून त्यांना टॉपलेस व्हायला सांगत फोटोशूट केलं. एवढंच नाही तर, मॉडेल्सचे व्हिडिओही बनवण्यात आले. इंडोनेशियामध्ये या प्रकरणाने आता राजकीय वळण घेतले आहे.
इंडोनेशिया एक इस्लामीक राज्य आहे. याठिकाणी गेल्या अनेक वर्षांपासून तेथे ब्यूटी कॉन्टेस्ट्सना विरोध झाल्याचं समोर आलं आहे. पण आता सहा मॉडेल्स प्रकरणानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी आयोजकांना विचारण्यात आल्यानंतर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. कंपनीच्या मालकांनी आणि त्यांच्या प्रवक्त्यांनी देखील धक्कादायक प्रकरणावर मौन बाळगलं आहे.
दरम्यान, रिपोर्टनुसार या प्रकरणाची चौकशी सुरु असल्याची माहिती मिळत आहे. अभिनय आणि मॉडलिंग क्षेत्रातून अशा घटना कायम समोर येत असतात. पूर्वी देखील लैंगिक अत्याचार, कास्टिंग काऊच यांसारख्या वाईट परिस्थितीचा सामना मॉडेल्स आणि अभिनेत्रींना कारावा लागला आहे. पण यावर व्यक्त होत्यासाठी महिलांच्या मनात संकोच असायचा..
पण परिस्थिती आता पूर्वीसारखी राहिलेली नाही. सोशल मीडियामुळे अभिनेत्री त्यांच्यासोबत घडलेल्या घटना स्पष्टपणे सांगतात. बॉलीवूडमध्ये #MeToo चळवळीअंतर्गत अनेक महिनांनी अनेक सेलिब्रिटींवर गंभीर आरोप केले होते.