सध्याच्या जमान्यात कुठल्याही चित्रपटाने 100 कोटीचा बिझनेस करणं मोठी गोष्ट नाहीय. आजकाल काही चित्रपटांच कलेक्शन 1000 कोटी पर्यंत पोहोचतं. पण 80 च्या दशकात कुठल्या चित्रपटाने 100 कोटी कमावले, तर त्या चित्रपटाला ब्लॉकबस्टर मानलं जायचं. कारण त्यावेळी चित्रपटांचा इतका बिझनेस नव्हता. 100 कोटी शब्द हिंदी सिनेमामध्ये 2000 च्या अखेरीस आला. पण त्याआधी एका सुपरस्टारच्या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली होती.
80 च्या दशकात 100 कोटीची कमाई करणाऱ्या त्या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि ऋषी कपूरसारखे बडे अभिनेते सुद्धा नव्हते. या चित्रपटाच नाव होतं, ‘डिस्को डान्सर’. बब्बर सुभाष या चित्रपटाचे दिग्दर्शक होते. हा त्याकाळात 100 कोटी कमावणारा पहिला हिंदी चित्रपट होता. ‘डिस्को डान्सर’ला 100 कोटी क्लबचा भाग मानलं जात नाही. कारण या चित्रपटाने बरीच कमाई परदेशातून केली होती.
कुठल्या देशात या चित्रपटाने सर्वाधिक कमाई केली?
‘डिस्को डान्सर’ चित्रपटात मिथुन चक्रवर्ती हिरो होता. या चित्रपटाने भारतात 6.4 कोटींची कमाई केली होती. त्यावेळी ही मोठी रक्कम होती. पण सोवियत युनियन म्हणजे आताच्या रशियात या चित्रपटाने प्रचंड यश कमावलं. हा चित्रपट वर्ल्डवाइड ब्लॉकबस्टर बनला. हा चित्रपट 1984 साली सोवियत युनियनमध्ये रिलीज झाला. तिथे 12 कोटीपेक्षा जास्त तिकीटांची विक्री झाली. एचटीच्या एका रिपोर्टनुसार या चित्रपटाने सोवियत युनियनमध्ये 92.28 कोटी रुपयांची कमाई केली होती.
संगीत कोणी दिलेलं?
‘डिस्को डान्सर’ चित्रपटामुळे सोवियत संघात मिथुन एक कल्ट स्टार बनला होता. या चित्रपटातील ‘जिमी जिमी’ हे गाणं चीन आणि रशियामध्ये भरपूर हिट ठरलं. आजही रशियात ‘डिस्को डान्सर’ हे गाणं वाजवलं जातं. या चित्रपटात मिथुनशिवाय ओम पुरी, गीता सिद्धार्थ आणि करण राजदान मुख्य भूमिकेत होते. राजेश खन्ना आणि किम सहाय्यक भूमिकेत होते. ‘डिस्को डान्सर’ चित्रपटाला बप्पी लहरी यांनी संगीत दिलं होतं.