मुंबई : बाॅलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना रूग्णालयात 10 फेब्रुवारी 2024 रोजी दाखल करण्यात आले. मिथुन चक्रवर्ती यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळाल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. सुरूवातीला मिथुन चक्रवर्ती यांच्या कुटुंबाकडून सांगण्यात आले की, हेल्थ चेकअपसाठी ते रूग्णालयात दाखल झाले. मात्र, त्यानंतर हे स्पष्ट झाले की, मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेन स्ट्रोक आला. यानंतर मिथुन चक्रवर्ती यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळाले. काही दिवस रूग्णालयात मिथुन चक्रवर्ती यांनी उपचार देखील घेतले.
मिथुन चक्रवर्ती यांच्या हेल्थ अपडेटकडे सर्वांच्या नजरा दिसल्या. काही दिवसांपूर्वीच मिथुन चक्रवर्ती यांना रूग्णालयातून सुट्टी देण्यात आलीये. आता थेट लेक आणि सुनेसोबत मिथुन चक्रवर्ती हे सुट्टीवर जाताना दिसत आहेत. मिथुन चक्रवर्ती, लेक मिमोह चक्रवर्ती आणि सून मदालसा शर्मा यांच्यावर सुट्टीवर निघाले आहेत. याचा एक फोटोही व्हायरल होतोय.
व्हायरल होणाऱ्या फोटोमध्ये मिथुन चक्रवर्ती, मदालसा शर्मा आणि मिमोह चक्रवर्ती हे दिसत आहेत. हा फोटो विमानामधील आहे. या फोटोमध्ये मिथुन चक्रवर्ती यांनी तोंडाला मास्क लावल्याचे देखील बघायला मिळतंय. मिथुन चक्रवर्ती यांना परत एकदा असे ठणठणीत पाहून चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण हे बघायला मिळतंय.
मदालसा शर्मा हिने हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केलाय. मात्र, हे तिघे नेमके कुठे फिरायला निघाले, याबद्दल काही कळू शकले नाहीये. मिथुन चक्रवर्ती यांनी एक मोठा काळ चित्रपटांमध्ये गाजवला आहे. विशेष म्हणजे मिथुन चक्रवर्ती यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. मिथुन चक्रवर्ती हे कायमच चर्चेत असणारे नाव आहे.
मिथुन चक्रवर्ती हे रूग्णालयात दाखल होते, त्यावेळेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसले. हेच नाही तर मिथुन चक्रवर्ती यांना भेटण्यासाठी काही भाजपाचे नेते रूग्णालयात गेले होते. यावेळी मिथुन चक्रवर्ती यांना ओळखणे देखील कठीण असल्याचे त्या फोटोंवरून दिसत होते. आता थेट मिथुन चक्रवर्ती हे फिरण्यासाठी निघाले आहेत.