मिथुन चक्रवर्ती यांचा रूग्णालयातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांनी केल्या प्रार्थना, अभिनेत्याला पाहून, थेट..

| Updated on: Feb 11, 2024 | 5:43 PM

Mithun Chakraborty Health : बाॅलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलंय. मिथुन चक्रवर्ती यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून चाहते हे त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. आता सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय.

मिथुन चक्रवर्ती यांचा रूग्णालयातील तो व्हिडीओ व्हायरल, चाहत्यांनी केल्या प्रार्थना, अभिनेत्याला पाहून, थेट..
Follow us on

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना रूग्णालयात दाखल करण्यात आल्याचे कळाल्यापासून त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण हे बघायला मिळतंय. मिथुन चक्रवर्ती यांनी एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवला आहे. मिथुन चक्रवर्ती यांची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. मिथुन चक्रवर्ती यांच्यावर सध्या कोलकता येथील रूग्णालयात उपचार हे सुरू आहेत. मिथुन चक्रवर्ती यांच्या आरोग्याबाबत मोठी अपडेट काही वेळापूर्वीच शेअर करण्यात आलीये.

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. मिथुन चक्रवर्ती यांचा हा व्हायरल होणारा व्हिडीओ रूग्णालयातील आहे. मिथुन चक्रवर्ती यांचा हा नवा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये मिथुन चक्रवर्ती हे दिसत असून ते बेडवर दिसत आहेत आणि बोलत आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांना रूग्णालयात भेटण्यासाठी पश्चिम बंगाल भाजपाचे प्रमुख सुकांता मजुमदार हे गेल्याचे दिसतंय. मिथुन चक्रवर्ती यांच्यावर कोलकाता येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता मिथुन चक्रवर्ती यांचा हाच व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओवर कमेंट करत अनेकांनी मिथुन चक्रवर्ती यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना या केल्या आहेत.

मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक आला असल्याचे सांगितले जातंय. सध्या मिथुन चक्रवर्ती यांची तब्येत ठिक असल्याचे देखील सांगितले जात आहे. मिथून यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे देखील कालच डाॅक्टरांकडून सांगण्यात आलंय. मात्र, हा व्हिडीओ पाहून चाहत्यांमध्ये चिंता बघायला मिळतंय.

वेळीच उपचार मिळाल्याने धोका टळल्याचे बोलले जातंय. मात्र, कालच मिथून चक्रवर्ती यांचा लेक मिमोह आणि सून मदालसा यांनी सांगिलते होते की, पप्पांची तब्येत ठिक आहे ते फक्त रूटीन चेकअपसाठी रूग्णालयात गेले. मात्र, आता हे स्पष्ट झालंय की, मिथुन चक्रवर्ती यांना ब्रेनस्ट्रोक आला होता. चाहते हे मिथुन चक्रवर्ती यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत.