आयेशा सय्यद, मुंबई : मागच्या काही दिवसात मराठी टीव्ही जगतात किरण माने (kiran mane) हे नाव चर्चेत आहे. ‘मुलगी झाली हो’ ( mulgi zali ho) या मालिकेत विलास पाटील (vilas patil) ही भुमिका करणारे अभिनेते किरण माने यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आणि त्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केलं गेलं. त्यानंतर काही दिवसात किरण यांना त्या मालिकेतून काढून टाकण्यात आलं. ही फेसबुक पोस्ट लिहिल्याने आपल्याला मालिकेतून काढलं गेलं, असा आरोप किरण माने यांचा आहे. त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत मनसेला (mns) विचारलं असता ‘नो कमेंट्स’ची भूमिका मनसेने घेतली आहे. मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संपर्क केला असता, मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ, असं त्यांनी सांगितलं.
अमेय खोपकर काय म्हणाले?
मागच्या काही दिवसात किरण माने वारंवार आपल्यावर अन्याय झाल्याचं माध्यमांशी बोलताना सांगत आहेत. यावर मराठी भाषेसाठी, मराठी माणसासाठी भूमिका घेणाऱ्या मनसेची काय भूमिका आहे? हे जाणून घेण्यासाठी आम्ही मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याशी संपर्क केला. त्यावेळी बोलताना अमेय खोपकर म्हणाले, ‘मला यावर काहीही बोलायचं नाही. किरण माने यांनी मालिकेतील इतर सहकलाकारांना त्रास दिलाय. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं.’ किरण यांचा आरोप आहे की, ‘मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर केलं गेलं.’ यावर ‘कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या सगळ्यावर योग्यवेळी मनसे आपली भुमिका मांडेल, असं खोपकर म्हणाले.
किरण माने यांची आजची फेसबुक पोस्ट
किरण माने यांनी आज एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. त्यात त्यांनी माध्यमांशी बोलताना माझेच पूर्व सहकलाकार माझ्या विरोधात बोलू शकतात. त्यांच्यावर तसा दबाव टाकण्यात आला आहे. असं त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलंय.
या सगळ्या प्रकारानंतर टीव्ही९ मराठीची टीम ‘मुलगी झाली हो’ या मालिकेच्या साताऱ्यातील सेटवर गेली. त्यावेळी किरण माने यांनी आपल्याला त्रास दिला असल्याचा आरोप काही कलाकारांनी केला.
संबंधित बातम्या