मुंबई | 28 नोव्हेंबर 2023 : भारतील क्रिकेटसंघाचा दमदार क्रिकेटपटू मोहम्मद शमी याने आपल्या उत्तम कामगिरीमुळे चाहत्यांच्या मनात राज्य केलं असलं तरी, मोहम्मद शमी कायम त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. क्रिकेटच्या मैदानावर मोहम्मद शमी याने अनेक विक्रम रचले पण क्रिकेटपटूला त्याच्या खासगी आयु्ष्यात अनेक अडचणींचा सामना कराला लागला आहे. मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ कायम पतीवर गंभीर आरोप करताना दिसते. आता देखील हसीन हिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये हसीन हिने अनेक धक्कादायक गोष्टींचा खुलासा केला आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोहम्मद शमी आणि पत्नी हसीन हिने केलेल्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे.
हसीन जहाँने सोशल मीडियावर पोस्ट करत तिच्याबद्दल रंगणाऱ्या चर्चांवर स्पष्टीकरण दिलं आहे. मोहम्मद शमी फलंदाजाला बाद करण्यासाठी पैसे देतो…. अशा रंगणाऱ्या चर्चांवर हसीन हिने पोस्ट लिहिली आहे. ‘समाजात होणारे अपराध ज्या लोकांना माहिती आहेत आणि जे लोक होणारे अपराध समजतात. माझ्याबद्दल सर्व काही खोटं पसरवण्याचा प्रयत्न सुरु आहे. समाजात मला बदमान करण्यासाठी कट रचण्यात आले आहेत…’
पुढे हसीन जहाँ म्हणाली, ‘उमेश नावाच्या एका मीडिया माफियाला शमी अहमद याने 2018 पैसे दिले होते. मी शमी अहमद याच्यावर कोणतेही आरोप लावलेले नाहीत आणि मी कोणती खोटी केस देखील केलेली नाही. जे काही शमी आणि त्याच्या कुटुंबियांनी माझ्यासोबत केलं, तेच सांगितलं आणि केसं केली. याप्रकरणी कोर्टाने अद्याप शमी याला क्लिनचीट दिलेली नाही आणि माझ्यावर देखील कोणते आरोप लगावलेले नाहीत.’
‘पण मॅनेज्ड मीडिया न्यायाधीश म्हणून काम करत असून मला खोटं सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे. आता अशा गुन्हेगारांचं काय करायचं? जो समाजाची दिशाभूल करून माझ्या आणि माझ्या मुलांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न करत आहे. ज्याच्याकडे पैसा आहे तो काहीही करेल आणि समाजातील लोक गप्प बसून शो बघतील एवढेच आपल्या समाजाचं अस्तित्व उरले आहे का? असा प्रश्न देखील हसीन हिने उपस्थित केला.
शमी अहमद स्वतःचे गुन्हे लपवण्यासाठी सर्व मर्यादा ओलांडत आहे, जर मी कोणतीही कारवाई केली नसती तर मला आणि माझ्या मुलीच्या निधनाला 5 वर्षांपेक्षा जास्त काळ झाला असता. तुम्हा सर्वांना आमच्याबद्दल काहीच माहिती नसतं. तुम्हाला कधीही आमचं सत्य कळत नाही… असं देखील हसीन जहाँ म्हणाली.