मोहनीश बहल यांच्या लेकीच्या सौंदर्यापुढे प्रसिद्ध अभिनेत्री फिक्या, चाहत्यांना आली तिच्या आजीची आठवण

| Updated on: Jan 15, 2024 | 12:20 PM

mohnish bahl daughter : 'तू जगातील सर्वात सुंदर महिला...', मोहनीश बहल यांच्या लेकीचं सौंदर्य पाहून चाहते अवाक्, तिची आजी होती प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्री... सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मोहनीश बहल यांच्या लेकीची चर्चा...

मोहनीश बहल यांच्या लेकीच्या सौंदर्यापुढे प्रसिद्ध अभिनेत्री फिक्या, चाहत्यांना आली तिच्या आजीची आठवण
Follow us on

मुंबई | 15 जानेवारी 2024 : इंडस्ट्रीतील सेलिब्रिटींच्या चर्चा कायम सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये तुफान रंगलेल्या असतात. पण गेल्या काही दिवसांपासून सेलिब्रिटी नाही तर, स्टारकिड्स तुफान चर्चेत आहेत. सध्या अभिनेते मोहनीश बहल यांच्या लेकीची चर्चा रंगली आहे. मोहनीश बहल यांच्या लेकीचं नाव प्रनूतन बहल असं आहे. प्रनूतन बहल हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण तर केलं, पण तिला आजीप्रमाणे प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली नाही. प्रनूतन बहल हिने ‘हेलमेट’ आणि ‘नोटबुक’ यांसारख्या सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. पण प्रनूतन बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान निर्माण करु शकली नाही. पण प्रनूतन तिच्या सौंदर्यामुळे कायम चर्चेत असते. आता देखील प्रनूतन हिचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.

प्रनूतन दिसायला प्रचंड सुंदर आहे. प्रनूतन सिनेमांमध्ये सक्रिय नसली तरी, सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर प्रनूतन हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी प्रनूतन कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील प्रनूतन हिने स्वतःचे काही फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

हे सुद्धा वाचा

 

 

प्रनूतन हिने फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांच्या प्रनूतन हिच्या आजीची आठवण आली. प्रनूतन हिच्या आजीचं नाव नूतन असं होतं. नूतन यांनी अनेक सिनेमांमध्ये अनेक मुख्य भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. नूतन यांच्या सौंदर्याच्या देखील तुफान चर्चा रंगलेल्या असायच्या… नूतन यांच्यासारखीच नातं प्रनूतन देखील दिसते असं चाहते म्हणतात.. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त प्रनूतन हिच्या सौंदर्याची चर्चा रंगली आहे.

प्रनूतन हिच्या फोटोंवर कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘प्रचंड सुंदर आणि गॉर्जियस’, अन्य एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘तू जगातील सर्वांत सुंदर महिला आहेस…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘सुंदरता असावी तर अशी…’ प्रनूतन हिच्या फोटोंवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

प्रनूतन हिचे वडील मोहनीश बहल टीव्ही आणि बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेते आहेत. मोहनीश बहल यांनी अनेक सिनेमे आणि मालिकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांचं मनोरंजन केलं आहेत. आज देखील मोहनीश बहल त्यांच्या अभिनयामुळे आणि सिनेमांमुळे चर्चेत असतात.