Most Rated Web Series: या वर्षातील धमाकेदार वेब सीरिज पाहिलेत का? क्राइम-सस्पेन्सचा पुरेपूर डोस
ओटीटी प्लॅटफॉर्मवर नेमकं काय पहावं हे निवडणं अनेकदा कठीण होतं. या वर्षी प्रदर्शित झालेल्या वेब सीरिजपैकी क्राइम-थ्रिलर-सस्पेन्सवर आधारित काही चांगल्या सीरिज कोणत्या, ते पाहुयात..
1 / 5
'दिल्ली क्राइम' या वेबी सीरिजचा पहिला सिझन खूप गाजला. आता त्याचा दुसरा सिझनही नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. दुसरा सिझन हा पहिल्यापेक्षा चांगला असल्याचं बोललं जात आहे. यालाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यामध्ये अभिनेत्री शेफाली शाह आणि राजेश तैलंग हे मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजला IMDb वर 8.5 रेटिंग मिळालं आहे.
2 / 5
क्राइम आणि सस्पेन्सवर आधारित सीरिज बघायची असेल, तर 'अपहरण सिझन 2' हा सर्वोत्तम पर्याय असेल. ही वेब सीरिज क्राइम आणि सस्पेन्सने भरलेली आहे. या वेब सीरिजचे अनेक डायलॉग्स सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. Voot या ओटीटी प्लॅटफॉर्मवर तुम्ही ही सीरिज पाहू शकता. IMDb वर त्याला 8.3 रेटिंग मिळालं आहे.
3 / 5
'क्रिमिनल जस्टीस'चा दुसरा सिझन डिस्ने प्लस हॉटस्टारवर उपलब्ध आहे. या सीरिजचीही कथा अत्यंत रंजक आहे. या सीरिजला IMDb वर 8.1 रेटिंग मिळालं आहे.
4 / 5
द ग्रेट इंडियन मर्डर ही सीरिज 'सिक्स सस्पेक्ट्स' या कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये रिचा चढ्ढा आणि प्रतीक गांधी मुख्य भूमिकेत आहेत. या सीरिजला IMDb वर 7.2 रेटिंग मिळालं आहे. तुम्ही ही सीरिज डिस्ने प्लस हॉटस्टारवर पाहू शकता.
5 / 5
ये काली काली आँखे ही वेब सीरिज नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे. यातही राजकारणाची छटा आहे आणि सीरिजची कथा खूपच रंजक आहे. त्याला IMDb वर 7 रेटिंग मिळालं आहे.