मुंबई : दाक्षिणात्या सिनेविश्वातील अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली आहे. अभिनेता समंथा, रश्मिका यांच्या शिवाय अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडमध्ये पदार्पण करत चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली आहे. एवढंच नाही, तर साऊथच्या अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूडच्या अभिनेत्रींना मागे टाकलं आहे. साऊथच्या अभिनेत्री फक्त प्रसिद्धी मध्येच नाही, तर नेटवर्थमध्ये देखील पुढे गेल्या आहेत. आज जाणून घेवू साऊथ अभिनेत्रींकडे असलेल्या संपत्तीबद्दल…
अभिनेत्री नयनतारा
साऊथची सर्वात श्रीमंत अभिनेत्री नयनतारा आहे. अभिनेत्रीची एकूण संपत्ती १६५ कोटी रुपये आहे. नयनताराने २००३ साली ‘मनासिनक्कारे’ सिनेमातून अभिनयाची सुरुवात केली. नयनताराने तेलुगू आणि मलयालममध्ये अनेक एकापेक्षा एक सिनेमे दिले आहेत.
अभिनेत्री तमन्ना भाटिया
तमन्ना साऊथच्या दुसऱ्या सर्वात श्रीमंत अभिनेत्रींपैकी एक आहे. अभिनेत्रीने वयाच्या १५ व्या वर्षी ‘चांद सा रोशन चेहरा’ सिनेमातून डेब्यू केलं. तमन्ना ११० कोटी रुपयांची मालकीन आहे.
अभिनेत्री समंथा रुथ प्रभू
आता फक्त साऊथच नाही, तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री समंथा रुथ प्रभू प्रचंड प्रसिद्ध आहे. समांथाची नेटवर्थ तब्बल ८९ कोटी रूपये आहे. अभिनेत्रीला ‘पुष्पा’ सिनेमातील ‘ऊ अंतावा’ या गाण्याच्या माध्यमातून लोकप्रियता मिळाली.
अभिनेत्री पूजा हेगडे
पूजा हेगडेची नेटवर्थ जवळपास ५० कोटी रुपये आहे. अनेक सिनेमांमधून अभिनेत्रीने उत्तम अभिनय करत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. सोशल मीडियावर देखील अभिनेत्री कायम सक्रिय असते.
अभिनेत्री रश्मिका मंदाना
रश्मिका मंदानाची नेटवर्थ जवळपास २८ कोटी रुपये आहे. सध्या अभिनेत्री बॉलिवूड पदार्पण आणि अभिनेता विजय देवरकोंडासोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत आहे.