मौनी रॉय हिचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन, 17 वर्षांपूर्वी कशी दिसायची अभिनेत्री? फोटो व्हायरल

| Updated on: Apr 06, 2024 | 3:22 PM

Mouni Roy | मौनी रॉय हिचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन, 17 वर्षांपूर्वीचा अभिनेत्रीचा साधा लूक पाहिल्यानंतर तुम्हालाही बसेल धक्का... पूर्वी फक्त मालिकांमध्ये दिसणारी मौनी आता बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या ट्रान्सफॉरमेशनची चर्चा...

मौनी रॉय हिचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन, 17 वर्षांपूर्वी कशी दिसायची अभिनेत्री? फोटो व्हायरल
Follow us on

अभिनेत्री मॉनी रॉय सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. अभिनेत्री सोशल मीडियावर एक फोटो किंवा व्हिडीओ पोस्ट केला तरी चाहते अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स, कमेंटचा वर्षाव करतात. आता मौनी चाहत्यांना फॅशन गोल्स देते. अभिनेत्री बोल्ड आणि हॉट लूकच्या चाहत्यांमध्ये चर्चा रंगलेल्या असतात. मौनी कायम तिच्या ग्लॅमरस लूकमुळे चर्चेत असते. पण 17 वर्षांपूर्वीचा अभिनेत्रीचा लूक पाहिल्यानंतर तुम्ही देखील हैराण व्हाल. मौनी रॉय हिचं जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशन चाहत्यांना थक्क करत आहे.

सांगायचं झालं तर, मौनी रॉय हिने एक ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्री म्हणून करियरला सुरुवात केली नव्हती. अभिनेत्रीने ‘क्योंकी सास की कभी बहू थी’ मालिकेतून करियरला सुरुवात केली. मालिकेत अभिनेत्रीने कृष्णा तुलसी भूमिकेला न्याय दिला होता. ज्यामध्ये अभिनेत्री कायम साडीमध्ये असायची.

 

 

तेव्हा मौनी हिने तिच्या साध्या लूकने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं होतं. मौनी हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्रीने दिल्ली येथून शिक्षण पूर्ण केल्यानंतर टीव्ही विश्वात पदार्पण केलं. मौनी हिने ‘क्योंकी सास की कभी बहू थी’ मालिकेतून करियरला सुरुवात केली. पण अभिनेत्रीला लोकप्रियता आणि प्रसिद्धी ‘देवों के देव महादेव’ मालिकेतून मिळाली.

‘देवों के देव महादेव’ मालिकेनंतर अनेक मालिकांमध्ये भूमिका बजावण्याची संधी अभिनेत्रीला मिळाली. त्यानंतर मौनी हिने कधीच मागे वळून पाहिलं नाही. ‘नागिन’ मालिकेत देखील अभिनेत्रीने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. पण अचानक बोल्ड लूकमध्ये समोर आल्यानंतर चाहत्यांना धक्का बसला. प्लॉस्टिक सर्जरी केल्यामुळे अभिनेत्रीला अनेकदा ट्रोल देखील करण्यात आलं.

 

टीव्ही विश्वात स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केलं. अनेक सिनेमांसाठी अभिनेत्रीने आयटम सॉन्ग केले आहेत. मौनी फक्त तिच्या अभिनयामुळेच नाही तर, डान्समुळे देखील कायम चर्चेत असते. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मौनी रॉय हिच्या जबरदस्त बॉडी ट्रान्सफॉरमेशनची चर्चा रंगली आहे.

मौनी सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर मौनी हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत असतात.