मुंबई : बॉलिवूड सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या टॉप अभिनेत्रींपैकी एक असणारी मौनी रॉय (Mouny Roy) आज लग्नबंधनात अडकतेय. तिच्या बॉयफ्रेंडसोबत ती लग्नगाठ बांधणार आहे. पण तिचा होणारा पती कोण आहे हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घेऊयात…
कोण आहे सूरज नांबियार?
सूरज मूळचा बंगळुरुचा पण कामानिमित्त सध्या तो दुबईत असतो. तो प्रसिद्ध बँकर आहे. तसंच त्याचा बिझनेसदेखील आहे. 2019 ला सूरज आणि मौनी यांची दुबईत एका पार्टीदरम्यान भेट झाली. मग दोघांची मैत्री झाली आणि नंतर ती मैत्री प्रेमात रूपांतरित झाली. मग दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला.
बंगळुरुत 6 ऑगस्टला एका जैन कुटुंबात सूरजचा जन्म झाला. सूरजचं प्राथमिक शिक्षण जैन इंटरनॅशनल रेसिडेन्शिअल स्कूलमध्ये झालं. नंतर 2008 मध्ये त्याने बेंगळुरूच्या आर. व्ही. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंग केलं. सूरज हा सध्या दुबईत राहत असला तरी त्याचा भाऊ नीरज हा पुण्यातील एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचा सह-संस्थापक आहे.
मौनी आणि सूरज यांचं हे शाही लग्न एक बीच डेस्टीनेशन वेडिंग आहे. या दोघांनीही दुबईत नव्हे तर गोवा डेस्टिनेशन वेडिंग करण्याचं ठरवलं आहे. या लग्न सोहळ्याला या दोघांच्या कुटुंबातील लोक आणि त्यांचे मोजके मित्रमंडळी उपस्थित असतील. त्याच्या या शाही लग्नाला कालपासूनच सुरुवात झाली आहे. काल हळदी आणि मेहेंदीचा कार्यक्रम पार पडला. याचे काही सोल मीडियावर पहायला मिळत आहेत. अभिनेत्री मंदिरा बेदीनेही इन्स्टाग्रामवर मौनी आणि तिचा नवरा सूरजसोबतचे फोटो शेअर केले आहेत. मंदिराने आपल्या पोस्टमध्ये लिहीलंय, ‘मौनी आणि सूरज… माझं तुम्हा दोघांवर खबप प्रेम आहे. जे तुम्हाला माहीत आहे त्यापेक्षा जास्त आहे.’ ‘नागिन’ मालिकेतील तिचा सहकलाकार अर्जुन बिजलानीनेही काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
लग्नानंतर उद्या (28 जानेवारी) ते एक रिसेप्शन पार्टी देणार असल्याची माहिती आहे. ज्यामध्ये मौनी रॉयचे जवळचे मित्र आणि कुटुंबातील काही मोजकी मंडळीच उपस्थित असतील, अशी माहिती आहे. या रिसेप्शनलाही मोजक्या लोकांनाच आमंत्रण असल्याचं कळतंय.
संबंधित बातम्या