Haseen Dillruba Review : ‘हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित, सुंदर कथानक आणि हटके स्टारकास्टसह परफेक्ट मर्डर मिस्ट्री तुमच्या भेटीला…

| Updated on: Jun 13, 2021 | 11:53 AM

निर्मात्यांनी हसीन दिलरुबा 'द अल्टिमेट कॉन्स्पिरसी' असं वर्णन केले आहे, तर तापसी पन्नूनं या जुन्या गूढ गोष्टींचे शब्द जोडले आहेत: ‘एक था राजा, एक थी रानी, ​​हूई शुरु एक खूनी प्रेम कहानी’ (Haseen Dillruba Review: The trailer of 'Haseen Dilruba' has been released, Perfect Murder Mystery with beautiful story and quirky star cast is here for you ...)

Haseen Dillruba Review : ‘हसीन दिलरुबा’चा ट्रेलर प्रदर्शित, सुंदर कथानक आणि हटके स्टारकास्टसह परफेक्ट मर्डर मिस्ट्री तुमच्या भेटीला...
Follow us on

मुंबई : परफेक्ट बॉलिवूड थ्रिलरसाठी कशाची गरज असते ? असा प्रश्न असेल तर अनेक जण तापसी पन्नू, एक खुनाचं रहस्य आणि सुंदर कथानक असं उत्तर देतील. ‘हसीन दिलरुबा’च्या (Haseen Dillruba) ट्रेलरनं हेच सगळं ऑफर केलं आहे. ट्रेलरमध्ये प्रेमाचा त्रिकोण म्हणून ओळखल्या जाणार्‍या तीन मुख्य पात्रांची ओळख आहे – राणीच्या रूपात तप्सी पन्नू, तिचा नवरा वृषभ म्हणून विक्रांत मेस्सी आणि तिचा प्रियकर नील त्रिपाठी अर्थात हर्षवर्धन राणे.

राणीला खून रहस्ये असलेल्या पुस्तकांची आवड

राणीला खून रहस्ये असलेली पुस्तकं फार आवडतात – दिनेश त्रिपाठी नावाचा लेखक तिचा आवडता आहे. तिचं लग्न वृषभशी झालं आहे. एका लहान गावात राहणाऱ्या वृषभला पहिल्या नजरेतच तिच्यावर प्रेम होतं. मात्र राणीला त्यांच्या लग्नात काहीतरी कमी असल्यासारखं वाटतं.

लग्नानंतर काही दिवसातच वृषभची हत्या

अशात लग्नानंतर काही दिवसात वृषभची हत्या होते आणि या हत्येनंतर कथेला कठोर आणि वेगळं वळण मिळतं – त्याच्या या भयानक मृत्यूमुळे त्याच्या गावात खळबळ उडते. संशयित खुनी म्हणून राणीची चौकशी केली जाते आणि तेव्हाच तिचा नील त्रिपाठीशी गुप्त संबंध चर्चेत येतो. तापसी पन्नू राणीसारखी हुशार आहे आणि तपास अधिकाऱ्यांच्या प्रश्नांना ती तीव्र प्रतिसाद देते. अधिकाऱ्याला मात्र खात्री असते की राणीनंच पतीचा खून केला मात्र आणखी काही गोष्टी दडलेल्या असल्याचं दिसतं.

हसीन दिलरुबा ‘द अल्टिमेट कॉन्स्पिरसी’

निर्मात्यांनी हसीन दिलरुबा ‘द अल्टिमेट कॉन्स्पिरसी’ असं वर्णन केले आहे, तर तापसी पन्नूनं या जुन्या गूढ गोष्टींचे शब्द जोडले आहेत: ‘एक था राजा, एक थी रानी, ​​हूई शुरु एक खूनी प्रेम कहानी’

तापसीचा सर्वोत्तम अभिनय आणि डायलॉग

‘एक था राजा, एक थी रानी, ​​हूई शुरु एक खूनी प्रेम कहानी’, संबंध तो मानसिक होते हैं, शारिरीक तो संभोग होता हैं, हर कहानी के ना बोहोत पैलू होते हैं फरक बस ये होता हैं की कहानी सुना कौन रहा हैं….

पाहा ट्रेलर

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee : मृत्यूच्या 5 वर्षांनंतर मोठी माहिती समोर, मुलाखत देत विकास गुप्तानं केला ‘हा’ खुलासा

Photo : पावसाळ्याचा आनंद लुटत जान्हवी कपूरनं शेअर केले बोल्ड फोटो, पाहा तिचा डान्सिंग अंदाज