स्टार कास्ट : राजकुमार राव, क्रिती सेनन, परेश रावल, अपारशक्ती खुराना, रत्ना पाठक शाह, मनु ऋषी चड्ढा, प्राची शाह-पंड्या
दिग्दर्शक : अभिषेक जैन
कुठे पहाल? : डिस्ने प्लस हॉटस्टार
‘मला कुटुंब पूर्ण करण्यासाठी दोन मुलांची गरज नाही, मला दोन आई-वडील हवे आहेत…’ या एका डायलॉगवरून तुम्हाला चित्रपटाची कथा काय असणार आहे, हे समजले असेलच. हा संवाद ‘हम दो हमारे दो’ या चित्रपटातील आहे, ज्यात राजकुमार रावचे पात्र बालप्रेमी उर्फ ध्रुव बोलत आहे. राजकुमार राव आणि क्रिती सेननचा हा चित्रपट त्या कथांपेक्षा वेगळा नाही, ज्यात बनावट पालक सादर करून विनोदाची छटा दाखवण्यात आली आहे.
‘हम दो हमारे दो’ हा एक सामान्य चित्रपट आहे, परंतु पालक म्हणून त्यांचे प्रेम शोधण्यासाठी वेगवेगळ्या प्रेमी युगुलांचे विचार कथेत ताजेपणा आणतात. ध्रुवने (राजकुमार राव) दीप्ती कश्यप (रत्ना पाठक) आणि पुरुषोत्तम (परेश रावल) यांना त्याचे आई-वडील कसे बनवले, जेणेकरून तो अनन्या (क्रिती सॅनन) आणि तिच्या कुटुंबावर इप्रेशन शकेल याभोवती ही कथा फिरते.
चित्रपटाची कथा पुरुषोत्तमच्या ढाब्यापासून सुरू होते, जिथे ध्रुव लहानपणी काम करतो. यादरम्यान त्याला दीप्ती भेटते, जी त्याला त्याचे नाव बालप्रेमीवरून बदलून दुसरे काहीतरी ठेवण्याचा सल्ला देते. यादरम्यान, पुरुषोत्तम गपचूप दिप्तीला पाहतो, ज्यावरून कळते की त्याला ती हवी आहे, परंतु कदाचित देवाला काहीतरी वेगळेच मंजूर असेल आणि दिप्तीचे लग्न दुसऱ्याशी होते. कथा अशी, आता ध्रुव उद्योजक झाला आहे. त्याच्या अॅपच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये तो अनन्या मेहराला भेटतो.
ध्रुव अनन्याशी बोलण्याचा खूप प्रयत्न करतो, पण या धडपडीत तो विचित्र कृत्य करत बसतो. त्याचवेळी अनन्याला ध्रुव खडूस असल्याचे जाणवते. मात्र, अनेक भेटीनंतर दोघेही प्रेमात पडतात आणि ध्रुव अनन्याला लग्नासाठी प्रपोज करतो. पण आता कथेत ट्विस्ट आला आहे. अनन्याला अशा मुलाशी लग्न करण्याची इच्छा आहे, ज्याचे संपूर्ण कुटुंब आहे आणि त्याच्याकडे एक कुत्रा देखील आहे. ध्रुव अनन्याला कोणत्याही परिस्थितीत गमावू इच्छित नाही, म्हणून तो पुरुषोत्तम आणि दिप्तीच्या रूपात आपल्या बनावट पालकांना घेऊन येतो.
पुरुषोत्तम आणि दिप्ती हे कॉलेजपासूनचे लव्ह बर्ड आहेत, पण काही कारणास्तव दोघांचे लग्न होत नाही. चित्रपटाच्या उर्वरित कथेत, ध्रुव पुरूषोत्तमची दिप्तीबद्दलची भावना त्याची योजना बिघडू नये आणि त्याला अनन्याला गमावू लागू नये, याची खात्री करण्याचा प्रयत्न करतो. शेवटी काय होते, हे जाणून घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला हा चित्रपट पाहावा लागेल, कारण तुम्ही स्वतःला हसण्यापासून रोखू शकणार नाही.
चित्रपटाचा पूर्वार्ध कॉमेडीने भरलेला आहे. चित्रपट हास्याची पातळी खूप वर नेतो. त्याच वेळी, चित्रपटाचा दुसरा अर्धा भाग थोडा लांब आहे, कारण शेवटचा एक तास खूप ड्रामा आणि भावनांनी भरलेला आहे. उत्तरार्धात चित्रपटातून कॉमेडीही गायब आहे. उत्तरार्धात एक उच्च बिंदू आहे, जेव्हा रत्ना पाठक राजकुमार रावशी बोलत असताना तिच्या मुलाची आठवण करून कोलमडते. दिग्दर्शक आणि त्याची लेखकांची टीम मुख्य कलाकारांना प्रेक्षकांच्या भावनांशी जोडण्यासाठी आणि त्यांच्या हृदयपर्यंत घडवून आणण्यासाठी पुरेसा वेळ देत नाही.
त्याचबरोबर कलाकारांच्या अभिनयाबद्दल बोलायचे झाले, तर या चित्रपटात एकापेक्षा एक अनुभवी कलाकार आहेत. राजकुमार राव आणि क्रिती सेनन यांची केमिस्ट्री चांगली आहे. त्याचबरोबर परेश रावल आणि रत्ना पाठक शहा यांनी त्यांच्या भावनांना तगडी स्पर्धा देत पडद्यावर ज्या पद्धतीने मांडल्या आहेत, त्यावरून त्यांचा प्रवास तुम्हाला जाणवू शकतो. कलाकारांचे वैशिष्ट्य असते आणि चित्रपटातील प्रत्येक कलाकार ते जगला आहे. चित्रपटाची कथा जुनी वाटत असली, तरी कलाकारांनी आपल्या पॉवर पॅक्ड अभिनयाने त्यात जिवंतपणा आणला आहे. याशिवाय मनु ऋषी चड्ढा, प्राची शाह पंड्या आणि अपारशक्ती खुराणा यांच्यासह बाकीच्या कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे.