चित्रपट : सत्यमेव जयते 2
दिग्दर्शक : मिलाप झवेरी
स्टार कास्ट : जॉन अब्राहम, दिव्या खोसला कुमार
सत्य आझाद एक प्रामाणिक गृहमंत्री यांना देशाला भ्रष्टाचारमुक्त करायचे आहे. मात्र यादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तथापि, जेव्हा शहरात काही भीषण हत्या घडतात, तेव्हा एसीपी जय आझाद यांना मारेकऱ्याला पकडण्यासाठी पाचारण केले जाते. आता यादरम्यान काय होते, हे चित्रपट पाहिल्यानंतरच प्रेक्षकांना कळेल.
‘सत्यमेव जयते 2’ भ्रष्टाचार आणि सत्तेच्या लालसेवर मात करण्याची ‘सत्यमेव जयते’ची स्टोरी लाईन फॉलो करतो. चित्रपट प्रेक्षकांना 80च्या दशकाच्या वाईब्स देईल. भ्रष्टाचाराशिवाय शेतकरी आत्महत्या, महिलांवरील हिंसाचार, लोकपाल विधेयक यासारखे मुद्दे चित्रपटात दाखवण्यात आले आहेत. यासोबतच आजच्या काळातील सोशल मीडिया आणि मीडियाबद्दलही चर्चा केली गेली आहे.
जॉन अब्राहम त्याच्या पात्रांमध्ये खूपच मुरलेला दिसलाय. वडील आणि जुळ्या मुलांच्या भूमिकेत तो अद्गी चपखल बसला. त्याच्या पात्रात कुठेही गोंधळ दिसला नाही. दिव्या खोसला कुमारने तिची भूमिका उत्तम रित्या साकारली आहे. गौतमी कपूर, अनूप सोनी, झाकीर हुसेन या चित्रपटातील उर्वरित स्टारकास्ट यांनी आपली भूमिका चोख बजावली.
चित्रपटाचा साउंडट्रॅक इतका चांगला आहे की, तो कानाला सुखावणारा आहे. ‘तेनू लेहेंगा’ गाणे असो किंवा ‘करवा चौथ’ आणि ‘मेरी जिंदगी है तू’ हा ट्रॅक.. या चित्रपटाचा अॅक्शन सीक्वेन्स मजेदार वाटेल, तो पाहून तुम्ही टाळ्या वा शिट्ट्या देखील वाजवू शकता.
जर, तुम्हाला मसालापट आणि अॅक्शनपॅक्ड चित्रपट आवडत असतील, तर तुम्हाला हा चित्रपट आवडेल. तसेच, जर तुम्हाला जॉनला 3 वेगवेगळ्या अवतारांमध्ये पाहायचे असेल, तर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता.
रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाचा ट्रेलर आणि गाण्यांना ज्याप्रकारे सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, त्यावरून चित्रपट पहिल्याच दिवशी 6-7 कोटींची कमाई करू शकतो, असे वर्तवले जात आहे.
‘सत्यमेव जयते 2’चा सामना सलमान खानच्या ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ या चित्रपटाशी होणार आहे, ज्यामध्ये सलमानसोबत आयुष शर्मा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांमध्ये चुरशीची स्पर्धा असणार आहे. आता या बॉक्स ऑफिस स्पर्धेत कोण बाजी मारतो हे पाहायचे आहे.
Bhediya First Look : वरुण धवन बनलाय खतरनाक ‘भेडिया’, अभिनेत्याचा जबरदस्त लूक पाहिलात का?
बाजीप्रभूंच्या अजोड स्वामीनिष्ठेची कथा, मोठ्या पडद्यावर दिसणार ‘पावनखिंड’चा अजरामर इतिहास!