वेब सीरीज : मुंबई डायरीज 26/11
OTT : Amazon Prime Video
दिग्दर्शक : निखिल अडवाणी आणि निखिल गोन्साल्विस
कलाकार : मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, मृण्मयी देशपांडे, नताशा भारद्वाज, सत्यजित दुबे, प्रकाश बेलावाडी, श्रेया धनवंत्री, इतर
26 नोव्हेंबर 2008 ही तारीख, कोणताही देशवासी विसरू शकत नाही. हीच तारीख आहे जेव्हा काही दहशतवाद्यांनी मुंबई हादरवून टाकली होती. काही चित्रपटांमध्येही ही घटना वेगळ्या पद्धतीने दाखवण्यात आली आहे. त्याचवेळी, ‘मुंबई डायरीज’मध्ये यावेळी डॉक्टरांच्या दृष्टिकोनातून ही घटना दाखवण्यात आली आहे. या घटनेनंतर मुंबईच्या डॉक्टरांची स्थिती कशी होती, तर रुग्णांची संख्या थांबत नव्हती, दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या समस्याही सुरू होत्या.
‘मुंबई डायरीज 26/11’मध्ये मोहित रैना, कोंकणा सेन शर्मा, मृण्मयी देशपांडे, नताशा भारद्वाज, सत्यजित दुबे, प्रकाश बेलावाडी, श्रेया धन्वंतरी यांच्यासह अनेक महत्त्वाच्या भूमिका आहेत. मोहित रैनाने डॉक्टरांच्या भूमिकेत जबरदस्त कामगिरी केली आहे, तर इतर कलाकारांनीही आपापल्या पात्रांना न्याय दिला आहे. मात्र, निखिल अडवाणी आणि निखिल गोन्साल्विसचे दिग्दर्शन थोडे हलके झाल्यासारखे वाटते. मालिकेत असे अनेक सीन्स आहेत, जे दिग्दर्शकांकडून सुधारले जाऊ शकले असते.
‘मुंबई डायरी 26/11’ मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, ज्यामुळे ही सीरीज खूप खास बनते. जसे की, वैद्यकीय उपकरणे साथ देत नसतील, संपली असतील तर काय करावे…, आणीबाणीच्या काळात पोलिसांच्या तपासाची गरज काय…, त्यात काय चूक आहे? वाईट परिस्थितीतही व्यक्तीला कसे वाचवावे… इ. यासह, वेब सीरीजमधील माध्यमांचे आंधळेपणाने कव्हरेज करण्याची स्पर्धा देखील हुबेहुबे दाखवण्यात आली आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान देखील होऊ शकते. अनेक किरकोळ मुद्द्यांची काळजीपूर्वक काळजी घेतली गेली असली, तरी मालिकेची लांबी काही वेळा त्याची गती मोडून काढताना दिसते. काही दृश्ये अपूर्ण वाटतात, जिथे पाहताना प्रेक्षकांना आश्चर्य वाटते की, या नंतर पुढे काय होणार आणि काय घडणे आवश्यक होते.
‘मुंबई डायरीज 26/11’ चे सुमारे 35-40 मिनिटांचे 8 भाग आहेत. ही वेब सीरीज ज्या थीमवर आणि जशा पद्धतीने दाखवली गेली आहे, अशा परिस्थितीत ती नक्कीच पाहण्यासारखी आहे. ही सीरीज पाहिल्यानंतर डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल, असे म्हणणेही चुकीचे ठरणार नाही.
या सीरीजच्या निमित्ताने आणि डॉक्टरांचा मुलगा असल्याने आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा देत मोहित रैना (Mohit Raina) म्हणाला, ‘एक मुलगा म्हणून मी खूप भाग्यवान ठरलो आहे, कारण माझे वडील डॉक्टर आहेत. ते काश्मीरमधील गावांच्या बाहेरील भागात सेवेवर होते. दिवसाच्या अखेरीस, जेव्हा ते घरी येत असत, तरी प्रत्येक रात्री आपत्कालीन परिस्थितीमुळे आमचे दार अनेक वेळा ठोठावले जायचे आणि त्यांना पुन्हा कोणाला तरी पहायला जावे लागत असे. दिवसाच्या अखेरीस देखील ते रुग्णांना तपासायला आणि त्यांना मदत करायाला नेहमीच सज्ज असत.’
‘ते जेव्हा परत येत, तेव्हा मला त्यांच्या हावभावावरून समजत असे की, ते रुग्णाला वाचवू शकले आहेत आणि त्यांच्या संपूर्ण क्षमतेनुसार ते त्याला मदत करू शकले आहेत. आणि म्हणून मला वाटते की मी आधीपासूनच फ्रंटलाइन वर्कर्सची कामाप्रतीची उत्कटता अनुभवू शकलो आणि त्यांच्याकडून प्रेरित होऊ शकलो, हे माझे सद्भाग्य आहे आणि कदाचित हेच या सीरीजमध्ये देखील उमटले आहे, ज्याचा भाग बनून मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो आहे’, असे अभिनेता मोहित रैना म्हणाला.
‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’च्या बहुप्रतीक्षित पोस्टरचे अनावरण, सलमान खानच्या विरुद्ध दिसणार आयुष शर्मा!