चित्रपट – मर्डर अॅट तिसरी मंझील 302
दिग्दर्शक – नवनीत बाज सैनी
कलाकार – इरफान खान, रणवीर शौरी, दिपल शॉ, लकी अली
प्लॅटफॉर्म – झी 5
मुंबई : दिवंगत अभिनेता इरफान खान (Irrfan Khan) यांचा ‘मर्डर अॅट तिसरी मंझिल 302’ (Murder at Teesri Manzil 302) हा चित्रपट 14 वर्षांनंतर Zee5वर प्रदर्शित झाला आहे. 20 महिन्यांनंतर इरफान खान यांना पडद्यावर पाहिल्यानं प्रेक्षकांनाही एक वेगळाच आनंद मिळणार आहे. नवनीत बाज सैनी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. या थ्रिलर चित्रपटाची कथा एका व्यावसायिकाची आहे ज्याची पत्नी बेपत्ता होते. चित्रपटात व्यावसायिकाची भूमिका रणवीर शौरी(Ranvir Shorey)नं साकारलीय. अभिषेकच्या (रणवीर शौरी) पत्नीला शोधण्याची जबाबदारी तेजिंदर सिंग (लकी अली)वर असते.
ट्विस्ट आणि टर्न्स
या क्राईम थ्रिलर चित्रपटात अनेक ट्विस्ट आणि टर्न्स आहेत. यावरून प्रेक्षक अंदाज लावतात, की मायाचं अपहरण किंवा हत्या करण्यात आलीय किंवा एखाद्या मोठ्या कटाचा भाग आहे. चित्रपटात इरफान शेखर उर्फ चांदची भूमिका साकारत आहे. तो या कटाशी संबंधित आहे. या चित्रपटाची स्क्रिप्ट कमकुवत असली तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवते. चित्रपट पाहत असताना तो हळूहळू उलगडत जातो. स्क्रिप्टमध्ये पात्रे नीट लिहिलेली नाहीत. याशिवाय, चित्रपटात पोलिसानं केलेले विनोद अनावश्यक वाटतात, त्यामुळे ते थोडं निराशा देणार वाटतं.
पात्रांची कामं कशी आहेत?
चित्रपटातला इरफान खानचा वन लाइनर तुम्हाला आवडेल. त्यात त्यांचं पात्र चांगलं दाखवलं आहे. मात्र, दीपलचा इरफानसोबतचा रोमान्स तितकासा प्रभावी वाटत नाही. दीपलची व्यक्तिरेखा लिहिताना अनेक त्रुटी आहेत, अनेक वेळा त्याचा अभिनय प्रभावहीन वाटतो. लकी अली ना विनोदी दिसतो ना तो पोलिसासारखा वाटतो.
थायलंडमधलं लोकेशन
रवी वालिया यांनी केलेली थायलंडमधलं लोकेशन्स कव्हर करणारी सिनेमॅटोग्राफी छान आहे. चित्रपटातली गाणी तुम्हाला आठवणार नाहीत. हा 126 मिनिटांचा चित्रपट आहे, विशेष म्हणजे तो उगाचच ओढला गेला नाही. Murder at teesri manzil 302 तुम्हाला इरफान खानच्या आठवणी देतो. पण हा चित्रपट तुम्हाला लक्षात ठेवायला आवडेल, असा नाही. त्याऐवजी तुम्ही द लंचबॉक्स, पिकू, मकबूल यासारखे चित्रपट पाहू शकता.
का पाहावा?
जर तुम्ही इरफान खानचे चाहते असाल तर तुम्ही हा चित्रपट पाहू शकता. चित्रपट न पाहण्याचं एक कारण आहे, ते म्हणजे चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हाला त्यातली गाणी आठवणार नाहीत. याशिवाय लेखकानं पात्रंही नीट लिहिली नाहीत, त्यामुळे पडद्यावरचा त्यांचा अभिनय कमकुवत वाटतो.