मुंबई : ‘अफत-ए-इश्क’ (Aafat-E-Ishq) हा नवीन चित्रपट ZEE5 वर प्रदर्शित झाला आहे, जो 2015चा हंगेरियन चित्रपट ‘Liza the Fox Ferry’ चे अधिकृत हिंदी रूपांतर आहे. ‘लिझा’ हा ब्लॅक कॉमेडी चित्रपट होता. ब्लॅक कॉमेडी म्हणजे अशी कॉमेडी, जी टॅबू टाईप विषयांवर विनोद निर्माण करते. जसे की मृत्यू! डार्क किंवा ब्लॅक कॉमेडीचा ट्रेंड भारतात सध्या सर्रास दिसत नाही. कुठलाही वाद निर्माण केल्याशिवाय आपले काम होत नाही. अशा परिस्थितीत ‘अफत-ए-इश्क’ हा चित्रपट कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी मात्र, सगळेच उत्सुक होते.
या कथेतील लल्लो ही तीस वर्षांची साधी मुलगी आहे. हिच्या मागे पुढे कोणीच नाही. म्हणजे कुटुंब-भावंडे नाहीत, कोणी मित्र नाहीत. आत्माराम नावाचे भूत फक्त तिचा मित्र आहे. ज्याला तिच्याशिवाय कोणीही पाहू शकत नाही. लल्लोला तिच्या आयुष्यातील प्रेमाची कमतरता भरून काढायची आहे. ती तसा करण्याचा प्रयत्नही करतो. पण इथूनच सगळे घोटाळे सुरू होतात, जेव्हा तिच्या जवळ येणारा प्रत्येक माणूस एक एक करून मरायला लागतो. लल्लोला वाटते की, तीच शापित आहे आणि तिच्या नशिबी प्रेम नाही. त्या माणसांच्या मृत्यूमागील गूढ आणि लल्लोचा शाप, ही संपूर्ण चित्रपटाची डार्क कॉमेडी आहे.
एक, जेव्हा जेव्हा कथा यूपीमध्ये सेट केली जाते, तेव्हा त्यातील पात्रांच्या बोलीमध्ये आपोआप बदल होतात. लल्लो बनलेल्या नेहा शर्माचा असा बदलेला उच्चार संपूर्ण चित्रपटात पाहायला मिळणार आहे. आम्ही तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, हे एका हंगेरियन चित्रपटाचे रूपांतर आहे. जर तुम्ही जर्मन किंवा हंगेरियन चित्रपट पाहत असाल, तर तुम्हाला तेथील चित्रपटांमधील पेस्टल रंगांची जाणीव होईल. ते सौंदर्य या हिंदी चित्रपटातही पाहायला मिळेल. गुलाबी पडदे, गडद हिरवे सिंक, निळा टब यातही दिसतात. मात्र या गोष्टी कथेला विकसित करण्याचे काम अजिबातच करत नाहीत. तरीही, रुपांतर करताना मूळ गोष्टींची काळजी घेतली जात आहे, हे पाहून छान वाटते.
पण संपूर्ण चित्रपटासाठी असे म्हणता येत नाही हे दुर्दैव! हा चित्रपट एखाद्या मजेदार कथा असलेल्या चित्रपटासारखा सुरू होतो. पण कथेला तिची मजा पुढे टिकवून ठेवता आलेली नाही. एका वेळेनंतर, चित्रपट इतका कंटाळवाणा होऊ लागतो की, तुम्ही फक्त ‘शेवटाची’ वाट पाहता. म्हणजे चित्रपट आपल्या कथेला योग्य गतीने पुढे नेण्यात अपयशी ठरत आहे. चित्रपटात मोठ्याने हसवणारे क्षण नाहीत, हा चेहऱ्यावर एक हलकेसे हास्य आणणारा कॉमेडी चित्रपट आहे. पण असे क्षण आणतानाही काहीसा कंजूषपणा केला आहे असे वाटते.
कथेतील मुख्य पात्र लल्लो आहे. लल्लोच्या भूमिकेत नेहा शर्माला बघून असं वाटतं की, तिला जितकं या पात्राबद्दल ब्रीफ मिळालं असेल, तितकंच तिने आपलं योगदान दिलं आहे. पण ते अगदीच वाखाणण्याजोगं वाटत नाही. पण तिचे कामही इतकेही वाईट नाही. या चित्रपटाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे अभिनेता दीपक डोबरियाल. जो विक्रम कमल नावाचा पोलीस अधिकारी बनला आहे. विक्रम हे फ्रेंच कॉमेडी कादंबरीतील डिटेक्टिव्ह पात्र असल्याचे जाणवते. हे पात्र यूपीच्या रणरणत्या उन्हात ट्रेंच कोट घालते. यासोबतच तो टोपी घालतो आणि त्याला कडक मिशा देखील आहेत. विक्रम काहीही करायला गेला की, त्या उलटच फळ मिळतं. चित्रपटाच्या बहुतेक भागामध्ये दीपकनेच या कॉमेडीची जबाबदारी उचलली आहे.
त्यांच्यानंतर आत्माराम बनलेल्या नमित दास यांचा नंबर येतो. संवादांच्या कमतरतेमुळे नमितने अधिकाधिक मूक अभिनय केलाय आणि तोही अगदी स्पष्टपणे. याशिवाय चित्रपटात आणखी एक विचित्र व्यक्तिरेखा आहे, ती म्हणजे प्रेम गुंजन. ज्याची भूमिका अमित सियालने केली आहे. प्रेम हा रोड साइद रोमियो आहे. तो सतत मुलींशी फ्लर्ट करत राहतो. नाक्यावर उभा राहून चीजी लाईन्स बोलत असतो. अमित सियालला अशा व्यक्तिरेखेत पाहणे खूप हटके वाटते. पण दुर्दैवाने त्याच्या अभिनय क्षमतेचा इथे पुरेपूर वापर झालेला वाटत नाही. फक्त त्यालाच नव्हे तर सर्वच कलाकारांसाठी हेच म्हणता येईल.
चित्रपटाने काही ठिकाणी आपला विनोद कायम ठेवला. जसा एक मारेकरी असतो, जो चक्क पेन्सिलने खून करण्याचा प्रयत्न करतो. ‘जॉन विक’ पाहिल्यानंतर जरा गंमत वाटते. बाकी, ‘अफत-ए-इश्क’ ही एक चांगला संदेश देणारी मात्र चुकीच्या दिशेला गेलेली कथा आहे. चित्रपट आणखी इंटरेस्टिंग बनू शकला असता, पण तसे झाले नाही.