बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत गेल्या काही दिवसांपासून प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. हिमाचल प्रदेशच्या मंडी मतदार संघातून निवडून आलेल्या कंगना यांच्याबद्दल अनेक चर्चा आता रंगत आहेत. राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी कधीच राजकारणात प्रवेश करणार नाही… असं वक्तव्य खुद्द कंगना यांनी केलं होतं. आता नुकताच एका पॉडकास्टमध्ये कंगना यांनी राजकारणातील प्रवासाबद्दल सांगितलं. यावेळी मुंबईत त्यांच्यासोबत घडलेल्या घटनेचा देखील त्यांनी उल्लेख केला. शिवाय राजकारणात येण्याचं कारण देखील कंगना यांनी सांगितलं.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी 2020 मध्ये घडलेल्या घटनेचा देखील उल्लेख केला. 2020 मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या निधनांनंतर सर्वत्र खळबळ माजली होती. 2020 मध्ये मुंबईत सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूची चौकशी सुरू असताना कंगना रनौत आणि शिवसेना यांच्यात तणाव निर्माण झाला होता.
त्याचवेळी कंगना यांच्या घराचा काही भाग बीएमसीने पाडला होता. घराचा तो भाग बेकायदेशीरपणे बांधण्यात आल्याचे बीएमसीने सांगितलं होतं. यावर कंगना म्हणाल्या, ‘आयुष्यात काहीही नवीन करण्याची माझी कल्पना कोणाबद्दलच्या कटुतेतून आलेली नाही.’
कंगना पुढे म्हणाल्या, ‘मी माझ्या वक्तव्यावर आजही ठाम आहे….’ कंगना म्हणाल्या होत्या, ‘अमिताभ बच्चन यांच्यानंतर कोणाला सर्वात जास्त सन्मान मिळत असेल तर, तो सन्मान मला मिळत आहे.’ सध्या सर्वत्र कंगना यांची चर्चा रंगली आहे.
‘2020 मध्ये घडलेली ती घटना मला अपमानित करणारी होती. मला असं वाटलं माझ्यासोबत हिंसा होत आहे. हिंसक पद्धतीने माझं घर तोडलं. त्यावेळी मला तो वैयक्तिक हल्ला वाटला. तेव्हा मला अनेक लोकांचा पाठिंबा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. लोक म्हणाले मी साहसी आहे. देशाने मला साथ दिली…’ असं देखील कंगना म्हणाल्या…
कंगना यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, बॉलिवूडमध्ये स्वतःची भक्कम ओळख निर्माण केल्यानंतर अभिनेत्रीने मोर्चा राजकारणाकडे वळवळा. कंगना यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली आहे विजयी झाल्या. मंडीच्या खासदार कंगना रनौत यांच्या नवीन प्रवासाची सुरुवात झाली आहे.
कंगना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. वादाचा मुकूट कायम आपल्या डोक्यावर मिरवणाऱ्या कंगना आता राजकारणात उतरल्या आहेत. सोशल मीडियावर देखील त्यांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर कंगना यांच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.