Ambani wedding: धोनीने घेतली राधिकाची गळाभेट, अनंत अंबानीतील खास क्षण

| Updated on: Jul 18, 2024 | 2:58 PM

Ambani wedding: अंबानींच्या लग्नाला धोनी हजेरी, अनंत - राधिका यांच्या लग्नानंतर क्रिकेटपटूने मारली राधिकाला मिठी, दोघांचा फोटो होतोय तुफान व्हायरल, फोटोमधील धोनीच्या एक्स-गर्लफ्रेंडच्या चेहऱ्यावरील भाव चर्चेत... सर्वत्र अंबानींच्या शाही लग्नाची चर्चा....

Ambani wedding: धोनीने घेतली राधिकाची गळाभेट, अनंत अंबानीतील खास क्षण
Follow us on

भारतातील नामवंत उद्योगपती आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचं लग्न राधिका मर्चंट यांच्यासोबत मोठ्या थाटात पार पडल. अनंत – राधिका यांच्या लग्नात अनेक दिग्गज आणि सेलिब्रिटींनी देखील हजेरी लावली होती. सध्या सोशल मीडियावर फक्त आणि फक्त अंबानींच्या शाही लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. शिवाय अनेक जण अनंत – राधिका यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देखील देत आहेत.

दरम्यान, क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी याने देखील अनंत – राधिका यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. धोनी याने इन्स्टाग्रामवर एक फोटो पोस्ट केला आहे. ज्यामध्ये राधिका हिने धोनी याला मिठी मारली आहे. तर अनंत आणि साक्षी देखील बाजूलाच उभे असल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये सर्वात मागे उभे असलेल्या अभिनेता रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन यांनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

 

धोनी, अनंत – राधिका यांना नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा देत म्हणाला, ‘राधिका… तुझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीच फिकं पडू नये… अनंत कृपया त्याच प्रेमाने आणि दयाळूपणे राधिकाची काळजी घ्या, ज्याप्रमाणे तुम्ही इतरांची काळजी घेता… तुमचं वैवाहिक आयुष्य आनंद, हास्य आणि साहसाने भरलेलं असावं… पुन्हा लवकरच भेटू….’ असं कॅप्शन धोनी याने फोटो पोस्ट करत दिलं आहे.

तर फोटोमध्ये रणवीर सिंग, धोनी याच्याकडे पाहात आहे तर, दीपिका पती रणवीर याच्याकडे रागाने पाहताना दिसत आहे. फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. फोटोवर नेटकरी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत प्रतिक्रिया देत आहे.

एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘राधिका – धोनी यांनी नाही तर, दीपिका – रणवीर यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.’ दुसरा नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘दुसऱ्या बायकोवर वाईट नजर नको टाकू…’, तिसरा नेटकरी म्हणाला, ‘ते सर्व ठिक आहे पण मागे दीपिका, रणवीरला म्हणत आहे – घरी चल…’ सध्या सोशल मीडियावर एकाच छताखाली असलेल्या सेलिब्रिटींचे फोटो व्हायरल होत आहेत.

धोनी आणि दीपिका पादुकोन यांचं रिलेशनशिप

धोनी आणि दीपिका पादुको अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होते. एक काळ असा होता जेव्हा फक्त इंडस्ट्रीमध्येच नाही तर, चाहत्यांमध्ये देखील दोघांच्या नात्याची चर्चा रंगली होती. आज दोघांचे मार्ग वेगळे झाले आहेत. पण सोशल मीडियावर आजही धोनी – दीपिका यांचे जुने फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.