मुंबई | 30 डिसेंबर 2023 : ‘लिटिल चॅम्प्स’च्या मंचावर झालेली प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांची पहिली ओळख आता लग्नापर्यंत पोहोचली आहे. 21 डिसेंबर रोजी प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांचं लग्न झालं. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता मुग्धा हिच्या गृहप्रवेशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गृहप्रवेश करताना प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी उखाणा देखील घेतला आहे.
मोठ्या थाटात आणि उत्साहात मुग्धा हिचा सासरी स्वागत करण्यात आले. मुग्धा हिच्या स्वागतासाठी सासरच्या मंडळींनी पूर्ण घर फुलांनी सजवलं होतं. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुग्धा हिच्या गृहप्रवेशाची चर्चा रंगली आहे. एवढंच नाही तर, गृहप्रवेश करताना प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी घेतलेले उखाणे देखील चाहत्यांना प्रचंड आवडले आहे…
गृहप्रवेशावेळी उखाणा घेताना प्रथमेश म्हणाला, “कपात ओतला चहा, चहाखाली ठेवली बशी….कपात ओतला चहा, चहाखाली ठेवली बशी…. मुग्धा माझी गरीब गाय बाकी सगळ्या मारक्या म्हशी…” प्रथमेश याने उखाणा घेतल्यानंतर पाहुणे पोट धरुन हसू लागले…
प्रथमेशनंतर मुग्धा उखाणा घेतल म्हणाली, “मंगळसूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर अन् माहेरची खूण प्रथमेशचं नाव घेऊन कलाश्रीमध्ये प्रवेश करते नीना आणि उमेश लघाटे यांची सून!” चाहत्यांना देखील मुग्धा हिने घेतलेला उखाणा प्रचंड आवडला आहे. प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी सोशल मीडियावर व्हिडओ पोस्ट केला आहे. तर व्हिडीओला ‘वेड’ सिनेमातील “सुख कळले…” हे गाणं लावलं आहे.
व्हिडीओ चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. सोशल मीडियावर प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहेत. सांगायचं झालं तर, जेव्हा प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन सोशल मीडियाच्या माध्यमातून नात्याची कबुली दिली, तेव्हा पासून दोघे चर्चेत आहेत.