मुंबई | दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेता राम चरण आणि पत्नी उपासना यांनी नुकताच बारसं केलं. राम चरण आणि उपासणा यांनी त्यांच्या चिमुकलीचं नाव क्लिन कारा कोनिडेला ठेवलं आहे. एवढंच नाही तर, अभिनेत्याने बारसा सोहळ्याचे फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. सध्या सर्वत्र राम चरण आणि त्याच्या चिमुकलीची चर्चा रंगत आहे. महत्त्वाचं म्हणजे लग्नाच्या ११ वर्षांनंतर राम चरण याला कन्या रत्न प्राप्त झाल्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. अशात जगातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांनी राम चरण याच्या मुलीला सर्वात महागडं गिफ्ट दिलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मुकेश अंबानी यांनी राम चरण याच्या लेकीला दिलेल्या गिफ्टची चर्चा रंगत आहे.
राम चरण याच्या लेकीचं बारसं असल्यामुळे अनेकांनी अभिनेत्याच्या मुलीला भेटवस्तू दिल्या. पण मुकेश अंबानी यांनी दिलेल्या गिफ्टची सर्वत्र चर्चा रंगत आहे. मुकेश अंबानी यांनी राम चरण याच्या लेकीला पाळणा दिला आहे. हा साधारण पाळणानसून चक्क सोन्याचा पाळणा आहे आणि क्लिन कारा कोनिडेला हिला दिलेल्या पाळण्याची किंमत तब्बल १ कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.
राम चरण याच्या मुलीला १ कोटी रुपयांचा पाळणाच नाही तर, मुकेश अंबानी यांनी त्यांच्या एका कर्मचाऱ्याला देखील अत्यंत महागडं गिफ्ट दिलं होतं. मुकेश अंबानी यांनी कर्मचारी मनोज मोदी यांनी १५०० कोटी रुपयांची इमारत भेट म्हणून दिली होती. या इमारतीचं नाव ‘वृंदावन’ असं आहे. मनोज मोदी रिलायन्स रिटेल आणि रिसायंन्स जियोमध्ये डायरेक्टरच्या पदावर आहेत.
महत्त्वाचं म्हणजे मुकेश अंबानी यांचा उद्योग मोठा करण्यामागे मनोज मोदी यांचा मोलाचा वाटा आहे. मनोज मोदी आणि मुकेश अंबानी यांचं संबंध देखील फार चांगले आहेत. मनोज मोदी यांनी १९८० पासून रिलायंन्स आणि मुकेश अंबानी यांच्आय सोबत काम करण्यास सुरुवात केली. अंबानी कुटुंब कायम त्यांच्या रॉयल आयुष्यामुळे चर्चेत असतात.
देशाचे सर्वात प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांच्या कुटुंबाची चर्चा कायम सर्वत्र रंगलेली असते. अंबानी कुटुंब देशातील सर्वात श्रीमंत कुटुंब आहे. अंबानी कुटुंबाची प्रत्येक गोष्ट सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शिवाय आपल्या जवळच्या व्यक्तींना दिलेल्या महागड्या भेटवस्तूंमुळे देखील अंबानी कुटुंब कायम चर्चेत असतं.