रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांचे कुटुंबीय नेहमी चर्चेत असतात. अंबानी कुटुंबातील मुलांनी उच्च शिक्षण घेतलं आहे. अंबानींची मोठी सून श्लोका मेहताचं किती शिक्षण झालंय ते जाणून घेऊयात.
आकाश अंबानीची पत्नी श्लोका मेहताने तिचं शालेय शिक्षण धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून पूर्ण केलं. त्यानंतर ग्रॅज्युएशन पूर्ण करण्यासाठी ती अमेरिकेला गेली. तिथे तिने प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीमधून अँथ्रोपोलॉजीमध्ये पदवी संपादित केली.
ग्रॅज्युएशननंतर श्लोकाने लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्समधून पॉलिटिकल सायन्सचं शिक्षण घेतलं. श्लोका मेहताकडे कायद्याचीही पदवी आहे. तिने कायदे शिक्षणात मास्टर्स केलं आहे.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मोठी सून श्लोका मेहता की भारतातील प्रसिद्ध हिरे व्यापाऱ्यांची मुलगी आहे. ती तिच्या कुटुंबातील तीन भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे. श्लोकाला सामाजिक कार्याची फार आवड आहे.
श्लोका मेहता आणि आकाश अंबानी यांनी 2019 मध्ये लग्नगाठ बांधली. या दोघांना दोन मुलं आहेत. श्लोका ही हिरे व्यापारी रसेल मेहता यांची मुलगी आहे.