मुकेश खन्ना हे त्यांच्या काळातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक. आजही त्यांना ‘शक्तीमान’ याचं नावाने ओळखले जाते. त्यांचा दमदार अभिनय आणि त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे ते नेहमीच चर्चेत असतात. कोणत्याही विषयवार ते बेधडकपणे त्यांचे मत मांडतात. असाच एक विषय आता समोर आला आहे ज्यावर त्यांनी संतापाने भाष्य केलं आहे.
कपिल शर्माच्या शोला अश्लील संबोधले
मुकेश खन्ना कपिल शर्माच्या शोबद्दल बोलले आहेत. मुकेश खन्ना यांनी कपिल शर्माच्या शोला अश्लील संबोधले आणि एका अवॉर्ड फंक्शनमध्ये कपिलने त्याच्याकडे 10 मिनिटे दुर्लक्ष केल्याचं सांगत नाराजी व्यक्त केली आहे. मुकेश खन्ना हे टीव्ही शो ‘महाभारत’मधील भीष्म पितामहच्या भूमिकेसाठी ओळखले जातात. तसेच ‘शक्तिमान’या भूमिकेसाठी आजही त्यांची आठवण होते. अलीकडेच त्यांनी कपिल शर्माच्या कॉमेडी शोबद्दल नाराजी व्यक्त केली आहे
मुकेश यांनी कपिल शर्माबद्दल संतापही व्यक्त केला आहे. अभिनेत्याचे म्हणणे आहे की कपिल शर्माच्या शोमध्ये जाण्यासाठी त्याला कधीही संपर्क साधला गेला नाही आणि त्याला संपर्क केला असता तरी त्याने नकार दिला असता. मुकेश खन्ना यांनीही कपिलच्या शोला अश्लील म्हटले होते.
एका मुलाखतीदरम्यान मुकेश खन्ना म्हणाले की, “त्याची समस्या काय होती हे मला माहित नाही, परंतु त्यांनी माझ्याशी कधीही संपर्क साधला नाही. कदाचित अहंकार आणि लाजाळूपणामुळे असेल. त्याचा शो पाहून लोक हसतात, पण मला त्यात शालीनता दिसत नाही.” असं म्हणत हा कार्यक्रम पाहाण्यासारखा नाही असं म्हटलं होतं.
प्रभू रामांचा अपमान केल्याचा आरोप
मुकेश खन्ना पुढे म्हणाले की, जेव्हा त्यांनी शोमधील अरुण गोविल असलेल्या एपिसोडचा प्रोमो पाहिला तेव्हा त्यांना प्रचंड संताप आला होता. अभिनेता म्हणाला, “मी संपूर्ण एपिसोड पाहिला नाही आणि फक्त प्रोमो पाहिला ज्यामध्ये अरुण गोविल दिसला. कपिल शर्माने त्याला विचारले की तू आंघोळ करता का? या प्रश्नानंतर तिथला जमाव अचानक ओरडायला लागतो की बघ, बघ, राम सुद्धा VIP अंडरवेअर घालतो. हे ऐकल्यानंतर अरुण गोविल तिथे शांत बसून हसत होते. मी तिथे असतो तर माझी चिडचिड झाली असती. ज्या माणसाचा इतका आदर आहे, त्याला तुम्ही असे प्रश्न विचारता” असं म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
अवॉर्ड शोदरम्यान कपिलने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने नाराजी
याशिवाय मुकेश खन्ना यांनी आणखी एक घटना सांगितली जेव्हा कपिल शर्माने एका अवॉर्ड शोदरम्यान त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं असल्याचं ते म्हणाले. मुकेश खन्ना यांनी सांगतले, “कपिलशी माझी पहिली ओळख अशी होती की तो एका अवॉर्ड फंक्शनमध्ये माझ्या शेजारी बसला होता. मला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. तो तिथे उपस्थित होता. जरी आम्ही आमच्या इंडस्ट्रीत एकत्र काम केले नसले तरी आम्ही एकमेकांची तब्येत विचारतो आणि सर तुम्ही कसे आहात. हा एक मार्ग आहे. कपिल माझ्या शेजारी 10 मिनिटे बसला, पण त्याने हॅलोही केल नाही. त्याच्याकडे शिष्टाचार नाही.” असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.
मुकेश खन्ना यांनी सांगितले की, त्यांनी कपिल शर्माच्या शोमध्ये कधीही न जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचे सहकारी गुफी पेंटल यांनी त्यांना सांगितले होते की, रामायणातील स्टार-कास्ट शोमध्ये येण्यासाठी तयार आहे आणि महाभारतातील कलाकारांनाही आमंत्रित केले जाईल असे सांगण्यात आले होते. तरी मुकेश खन्ना यांनी कपीलच्या शो मध्ये त्यांना आमंत्रित केलं तरी ते शोमध्ये गेले नसते असं त्यांनी स्पष्टपणे मत मांडलं आहे.