मुंबई लोकलचा विचार जरी केला तरी समोर उभी राहते ती म्हणजे खच्च भरलेली गर्दी. कामावर वेळेत पोहोचण्यासाठी मुंबईकरांची लाईफलाईन असलेली लोकल अनेकांचे स्वप्न पूर्ण करते. तर अनेकांना दुःखात देखील आनंद शोधण्यासाठी मदत करते. असाच एक व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुरुषांच्या डब्ब्यातील हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. दिवसभर काम करु थकलेला मुंबईकर रोजच्या लोकलसाठी धावत-पळत कार्यालयातून निघतो आणि रोजची ट्रेन पकडतो… पण हा प्रवास खास होतो बॉलिवूडच्या गाण्यांनी…
व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये मुंबईकर प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक सोनू निगम याच्या गाण्यावर ताल धरताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये प्रवासी सोनू निगम याचं ‘ये दिल दिवाना’ गाणं गाताना दिसत आहे. गाणं अनेक वर्ष जुनं आहे, मुंबईकरांसाठी खास आहे.
इन्स्टाग्रामवर व्हिडीओ आयुष नावाच्या एका युजरने पोस्ट केला आहे. खास व्हिडीओ पोस्ट युजरने कॅप्शनमध्ये ‘कला प्रत्येक ठिकाणी स्वतःचं स्थान शोधून काढतेच…’ असं लिहिलं आहे. सर्वात म्हत्त्वाचं म्हणजे सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोनू निगम याच्यापर्यंत पोहोचला आहे.
मुंबईकरांचा व्हिडीओ पाहून सोनू निगम याने देखील स्वतःच्या भावना व्यक्त केल्या आहेत. गायक म्हणाला, ‘किती खास व्हिडीओ आहे… मला फार आनंद झाला आहे. तुम्हा सर्वांवर देवाची कृपा असूदे…’ सांगायचं झालं तर, व्हिडीओ आतापर्यंत 8.6 मिलियनपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. तर 8.34 लोकांनी व्हिडीओ लाईक केला आहे.
व्हिडीओ कमेंट करत एक नेटकरी म्हणाला, ‘ही जादू फक्त एक मुंबईकर समजू शकतो…’, दुसरा नेटकरी म्हणाला, ‘दिवसभर ऑफिसमध्ये काम केल्यानंतर लोकलचा प्रवास आनंद देतो…’, अन्य एक नेटकरी म्हणाला, ‘हे फक्त मुंबईत होऊ शकतं आणि तेही लोकलमध्ये…’ व्हिडीओ सर्वांना फार आवडला आहे.
‘ये दिल दिवाना’ गाण्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘परदेस’ सिनेमातील हे गाणं अभिनेता शाहरुख खान याच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. सिनेमा 1997 मध्ये प्रदर्शित झाला होता. गाणं सोनू निगम, हेमा सरदेसाई आणि शंकर महादेवन यांनी गायलं आहे.