सोशल मीडियावरील पोस्टप्रकरणी मराठी अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; आरोपीला अटक

| Updated on: Jul 07, 2022 | 10:12 AM

इस्लामविरुद्ध कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर लिहू नये यासाठी अभिनेत्याला संबंधित चालकाने धमकी दिली होती. मुंबई (Mumbai) क्राईम ब्रांचने आरोपीला वांद्रे (Bandra) इथून अटक केली आहे. सायबर क्राइम सेलच्या मदतीने क्राइम इंटेलिजन्स युनिटने मंगळवारी रात्री आरोपी रिझवान खानला वांद्रे इथल्या ट्रान्झिट कॅम्पमधून अटक केली.

सोशल मीडियावरील पोस्टप्रकरणी मराठी अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी; आरोपीला अटक
सांगलीत बडोदा बँकेची 16 कोटीं 97 लाखाची फसवणूक
Image Credit source: tv9
Follow us on

ट्विटरद्वारे मराठी अभिनेत्याला (Marathi actor) जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या 25 वर्षीय टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली. इस्लामविरुद्ध कोणतीही पोस्ट सोशल मीडियावर लिहू नये यासाठी अभिनेत्याला संबंधित चालकाने धमकी दिली होती. मुंबई (Mumbai) क्राईम ब्रांचने आरोपीला वांद्रे (Bandra) इथून अटक केली आहे. सायबर क्राइम सेलच्या मदतीने क्राइम इंटेलिजन्स युनिटने मंगळवारी रात्री आरोपी रिझवान खानला वांद्रे इथल्या ट्रान्झिट कॅम्पमधून अटक केली. आयपीसी सेक्शन 153 (A) (धर्म, वंश, जन्मस्थान, निवासस्थान, भाषा या कारणांवरून गटांमध्ये शत्रुत्व वाढवणे) आणि 295 (A) (जाणूनबुजून आणि दुर्भावनापूर्ण कृत्यांसाठी, कोणत्याही वर्गाच्या किंवा धर्माचा अपमान करून धार्मिक भावना दुखावणे) या कलमांतर्गत रिझवानविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला महानगर दंडाधिकारी यांच्यासमोर हजर केलं असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

रिझवानने कोणालाही धमकी दिली नसून त्याला चुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्याचा युक्तीवाद आरोपीच्या वकिलाने केला. “माझा क्लाएंट त्याच्या ट्विटर अकाऊंटद्वारे लोकांना इस्लामविरुद्ध कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी करू नये अशी विनंती करत होता, परंतु पोलिसांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला आणि त्याला अटक केली,” असं दुबे यांनी न्यायालयात सांगितलं.

सोशल मीडियावरील आक्षेपार्ह मजकूरावर नजर ठेवणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया सेलने 1 जुलै रोजी रिझवानचं ट्विट पाहिलं. “आमची टीम सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आक्षेपार्ह मजकूरावर कडक नजर ठेवत होती आणि त्यांना ब्लॉक करत होती. आम्हाला खानचं ट्विट आढळलं, ज्यामध्ये तो धमकी देताना दिसला,” असं सेलने स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा