बाॅलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर 14 एप्रिलला पहाटे गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. हेच नाही तर सलमान खान याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण बघायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून सलमान खान याला लॉरेंस बिश्नोई याच्याकडून सतत जीवे मारण्याच्या धमक्या या मिळताना दिसत आहेत. सलमान खान याच्या घरावर झालेल्या गोळीबाराची जबाबदारी देखील लॉरेंस बिश्नोई याचाच भाऊ अनमोल बिश्नोई याने घेतली. पोलिसांनी या गोळीबार प्रकरणातील हल्लेखोरांना अटकही केलीये.
आता नुकताच या प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेला मोठे यश मिळाले आहे. मुंबई गुन्हे शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई गुन्हे शाखेने सुरतमधील तापी नदीतून सलमान खानच्या घराबाहेर गोळीबारात वापरलेली एक पिस्तुल आणि काही काडतुसे जप्त केली आहेत. मुंबई पोलिसच्या गुन्हे शाखेचे अधिकारी आज सकाळपासून तापी नदीमध्ये सर्च आपरेशन करत होते.
आरोपींनी दिलेल्या माहितीच्या आधारे सर्च आपरेशन सुरू होते. सलमान खानच्या घरावर फायरिंग केल्यानंतर आरोपी भुजला पळून गेले होते. मात्र, त्या अगोदर त्यांनी फायरिंगमध्ये वापरलेली बंदूक तापी नदीच्या पाण्यात टाकून दिली होती. जी मुंबई पोलिसांच्या हाती लागली आहे. आता या प्रकरणात असूनही काही मोठे खुलासे हे होऊ शकतात.
हल्लेखोरांनी चाैकशीमध्ये खुलासा केला की, त्यांना सलमान खानच्या घरावर 10 राऊंड फायर करण्याचे आदेश हे देण्यात आले होते. परंतू दुचाकीवरून त्यांना 10 राऊंड फायर करणे शक्य झाले नाहीत. चाैकशीमध्ये असून एक हैराण करणारी माहिती ही पुढे आलीये, या हल्लेखोरांना गोळीबार करण्याचे प्रशिक्षण देखील देण्यात आले होते.
हल्लेखोरांना बिहारमध्ये गोळीबार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. पोलिस अजूनही या प्रकरणात तपास करत आहेत. या प्रकरणात आरोपींना पैसे आणि शस्त्रे पुरविणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोलीस अद्याप पोहोचू शकलेले नाहीत. हे स्पष्ट आहे की, बिष्णोई टोळीपैकीच व्यक्तीने यांना पैसे आणि शस्त्रे पुरवली गेली. हल्लेखोरांना नेमके कुठे प्रशिक्षण दिले, याचा शोध देखील पोलिसांकडून घेतला जातोय.