मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : उर्फी जावेद व्हायरल व्हिडीओ प्रकरणी ओशिवरा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ओशिवरा पोलिसांनी दोन महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे. ज्यामुळे उर्फी हिच्या अडचणींमध्ये मोठी वढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, उर्फी जावेद हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. ज्यामध्ये दोन महिला पोलीस कॉन्स्टेबल आणि दोन पुरुष पोलीस उर्फी जावेदला छोटे कपडे घातल्याबद्दल ताब्यात घेताना दिसत होते.
संबंधीत प्रकरणी उर्फी जावेद हिच्या विरोधात ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खोटा व्हिडीओ बनवून मुंबई पोलिसांची बदनामी केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावर कारवाई करत ओशिवरा पोलिसांनी दोन महिला आणि दोन पुरुषांना अटक केली आहे.
व्हिडीओ शूट करण्यासाठी वापरण्यात आलेली गाडी देखील पोलिसांनी जप्त केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून सर्वत्र खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर देखील सर्वत्र उर्फी जावेद हिची चर्चा रंगली आहे. याआधी देखील उर्फी हिच्या तोकड्या कपड्यांमुळे वाद निर्माण झाला होता.
सोशल मीडियावर उर्फी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. उर्फी हिची फॅशन अनेक जणांना आवडते, तर अनेक जण तिचा विरोध करताना देखील दिसतात. तोकड्यांमुळे कायम वादाच्या भोवऱ्यात असलेली उर्फी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
उर्फी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी उर्फी कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. आता देखील व्हायरल व्हिडीओमुळे उर्फी वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.
उर्फी हिने तिच्या करियरची सुरुवात छोट्या भूमिका साकारत केली. पण उर्फी स्वतःची ओळख निर्माण करण्यास अपयशी ठरली. त्यानंतर उर्फीने ‘बिग बॉस ओटीटी’ मध्ये प्रवेश केला. पण तरी देखील उर्फी हिला यश मिळालं नाही. त्यानंतर उर्फी हिची फॅशन तिची ओळख झाली. पण उर्फी हिला तिच्या फॅशनमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.