मुंबई : बिग बाॅस 17 मध्ये मोठा वाद झाल्याचे बघायला मिळतंय. सध्या सोशल मीडियावर एक प्रोमोचा व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडीओमध्ये घरात खडाजंगी बघायला मिळतंय. अभिषेक कुमार, ईशा आणि अनुराग डोभाल हे मनारा चोप्रा हिच्याबद्दल बोलताना दिसले. मात्र, हे एकदम हळू आवाजात बोलत होते. मग काय बिग बाॅसने थेट अभिषेक याला म्हटले की, जे बोलायचे आहे ते जोरात बोल. अभिषेक हा मनारा चोप्रा हिच्याबद्दल बोलताना दिसला. थेट अनुराग याला मनाराच्या विरोधात भडकवताना अभिषेक दिसला.
बिग बाॅसला अभिषेक सांगत असतानाच तिथे मुनव्वर फारुकी आणि मनारा चोप्रा यांच्यासोबत घरातील इतर काही सदस्य हे जमा झाले. यावेळी मुनव्वर फारुकी आणि अभिषेक यांच्यामध्ये वाद होताना दिसला. इतकेच नाही तर अभिषेक याने थेट मुनव्वर फारुकी याचा हात पकडल्याचे व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसतंय. यानंतर मुनव्वर फारुकी भडकला.
मनारा चोप्रा आणि अभिषेक यांच्यामध्ये मोठा वाद झाला. यावेळी मुनव्वर फारुकी हा मनारा चोप्रा हिला बाजूला घेऊन जाताना देखील दिसला. मनारा चोप्रा थेट अभिषेक कुमार याला म्हणाली की, माझ्या मित्रांना अजिबात भडकून देऊ नकोस. यानंतर मनारा चोप्रा हिच्या थेट अंगावर जाताना अभिषेक कुमार हा दिसला.
Promo #BiggBoss17 #AbhishekKumar aur #MannaraChopra me hua jhgdha pic.twitter.com/tUNCxrJ0DZ
— The Khabri (@TheKhabriTweets) November 30, 2023
मुनव्वर फारुकी आणि मनारा चोप्रा यांचे नाव गेल्या काही दिवसांपासून सतत जोडले जात आहे. मात्र, त्यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले की, ते फक्त मित्रच आहेत. मुनव्वर फारुकी हा जबरदस्त गेम खेळताना बिग बाॅसच्या घरात दिसतोय. विशेष म्हणजे मुनव्वर फारुकी याचे फार काही वाद घरात होताना यापूर्वी अजिबातच दिसले नाही.
मुळात म्हणजे बिग बाॅस 17 चा विजेता म्हणून मुनव्वर फारुकी याच्याकडे बघितले जाते. मुनव्वर फारुकी याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बाॅस 17 च्या घरात दाखल झालीये. मात्र, अंकिता आणि विकी यांच्यामध्ये मोठे वाद हे घरात बघायला मिळत आहेत.