मुंबई : बिग बॉस 17 च्या घरात जोरदार हंगामे बघायला मिळत आहेत. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये क्रेझ देखील आहे. आता बिग बॉस 17 चा फिनाले जवळ आलाय. बिग बॉस 17 च्या घरात नुकताच जोरदार हंगामा बघायला मिळाला. हेच नाही तर जोरदार भांडणे बिग बॉस 17 च्या घरात झाली. बिग बाॅसच्या घरात टॉर्चर टास्क हा पार पडलाय. यावेळी थेट मोठी भांडणे झाली. फक्त भांडणेच नाही तर चक्क एकमेकांच्या अंगावर मारण्यासाठी विकी जैन आणि मुनव्वर फारुकी हे गेले. यानंतर घरात मोठा हंगामा झाल्याचे बघायला मिळतंय.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तूफान व्हायरल होताना दिसतोय. हा व्हिडीओ पाहून लोक हे चांगलेच हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. मुनव्वर फारुकी आणि विकी जैन हे एकमेकांच्या अंगावर मारण्यासाठी गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल होतोय. टॉर्चर टास्कदरम्यान या दोघांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जातंय.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, विकी जैन आणि आयशा हे बादली छतावर फेकतात. ही बादली काढण्याचा प्रयत्न मुनव्वर करतो. त्यावेळी मुनव्वर याला खाली उतरवण्याचा प्रयत्न विकी करतो आणि यामध्ये मुनव्वरचा तोल जातो आणि तो खाली जमिनीवर पडतो. यावेळी मुनव्वरवरला काही दुखापत झाली नाही.
त्यानंतर मुनव्वरचा पारा हा चांगलाच चढतो आणि तो थेट चिडतो आणि विकी जैन याच्या अंगावर जातो. यानंतर या दोघांमध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहेत. दोघेही मारण्यासाठी एकमेकांच्या अंगावर जाताना दिसत आहेत. घरातील इतर सदस्य हे यांची भांडणे मिटवताना दिसत आहेत. अंकिता लोखंडे ही विकी जैन याला शांत करताना दिसत आहे.
बिग बाॅस 17 च्या घरात पहिल्यांदाच मुनव्वर फारुकी आणि विकी जैन यांच्यामध्ये अशाप्रकारची भांडणे होताना दिसली आहेत. मुनव्वर फारुकी आणि अंकिता लोखंडे हे खूप चांगलेच मित्र आहेत. यावेळी अंकिता विकी जैन याच्यासोबतच मुनव्वर फारुकी याला देखील समजून सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र, हा प्रोमोचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.