‘बिग बॉस’ विजेता आणि कॉमेडियन मुनव्वर फारुकी सध्या मोठ्या अडचणींचा सामना करत आहे. मुनव्वर याच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर येत आहे. मुनव्वर एका कार्यक्रमासाठी दिल्लीमध्ये आला होता. जेथे त्याला जीवेमारण्याची धमकी मिळाली. दिल्लीत जीवेमारण्याची धमकी मिळाल्यानंतर मुनव्वर तडकाफडकी मुंबईकडे रवाना झाला. शनिवारी पोलीस स्पेशल सेलला याप्रकरणी माहिती मिळाली. दिल्लीतील इनडोअर स्टेडियम आणि सूर्या हॉटेलमध्ये ही घटना घडली.
मुनव्वर आणि यूट्यूबर एल्विश दिल्लीतील सूर्या हॉटेलमध्ये एकत्र राहिले. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबार करणाऱ्यांनी हॉटेलची रेकीही केली होती. मुनव्वर आणि एल्विश आयजीआय स्टेडियमवर मैत्रीपूर्ण सामना खेळण्यासाठी गेले होते तेव्हा दिल्ली पोलिसांना याची माहिती मिळाली. ही बातमी मिळताच ते तात्काळ आयजीआय स्टेडियमवर पोहोचले. एवढंच नाही तर सामना काही काळ थांबवावा लागला.
अशात पोलीसांनी पूर्ण स्टेडियमची पहाणी कोली. स्टेडियमची पहाणी झाल्यानंतर सामना पुन्हा सुरु करण्यात आला. अशात सामना संपताच मुनव्वर याला तडकाफडकी मुंबईत पाठवून देण्यात आलं. रिपोर्टनुसार, धमकीनंतर मुनव्वरच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. आता मुनवर जेव्हाही दिल्लीत येईल तेव्हा त्याच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाईल. अशी माहिती देखील समोर येत आहे.
सांगायचं झालं तर, नुकताच एंटरटेनमेंट क्रिकेट लीग 2024 सुरू झाली आहे. हे पाहण्यासाठी मुनव्वर फारुकी दिल्लीत गेला. यावेळी मुनव्वर याच्यासोबत एल्विश यादव, अभिषेक मल्हान, सोनू शर्मा आणि हर्ष बेनिवाल देखील उपस्थित होते. अनेक सोशल मीडिया स्टार लीग पाहाण्यासाठी आले होते. एंटरटेनमेंट क्रिकेट लीग 13 – 22 सप्टेंबर पर्यंत असणार आहे.
मुनव्वर फारुकी याच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, नुकताच, मुनव्वर याला उर्फी जावेद हिचा शो ‘फॉलो कर लो’ च्या एका एपिसोडमध्ये पाहण्यात आलं. आता मुनव्वर सिनेमांमध्ये देखील दिसणार असल्याची चर्चा रंगली आहे. मुनव्वर कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.