Munmun Dutta and Raj Anadkat engaged : तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेत बबिता जीची भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता आणि राज अनाडकट यांच्या अफेअरची गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चा होती. दोघे ही एकमेकांना डेट करत असल्याची बातमी आली होती. मात्र या दोघांनीही कधीही सोशल मीडियावर आपल्या नात्याच्या बातम्यांचे खंडन केले होते.
आता नुकतेच पुन्हा एकदा त्यांच्या नात्याच्या बातम्यांनी जोर पकडला आहे. यावेळी समोर आलेली बातमी ऐकून जेठालालला धक्का बसला असेल. कारण जेठालालची बबिता जी उर्फ मुनमुन दत्ता हिने तिच्यापेक्षा 9 वर्षांनी लहान असलेल्या राज अनाडकटशी गुपचूप एंगेजमेंट केली आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, जेठालालचा ऑनस्क्रीन मुलगा टप्पू उर्फ राज अनाडकट आणि मुनमुन दत्ता यांनी त्यांच्या कुटुंबियांच्या उपस्थितीत साखरपुडा केला आहे. मुनमुन दत्ता आणि राज अनाडकट यांचा गुजरातमध्ये एंगेजमेंट झाल्याची चर्चा आहे.
मुनमुन आणि राज या दोघांच्या कुटुंबीयांनी त्यांचे नाते मान्य केल्यानंतर आता दोघांनी एक पाऊट पुढे येत एंगेटमेंट केल्याची बातमी आहे. मुनमुन दत्ता आणि राज अनाडकट यांनी अद्याप त्यांच्या एंगेजमेंटच्या वृत्तावर कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
मुनमुन दत्ता 2008 पासून तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) चा भाग आहे. तिने शोमध्ये अय्यरच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. बबिताजी आणि टप्पूचे वडील जेठालाल यांची स्टोरी या मालिकेची लाईफ लाईन आहे. राज अनाडकट 2017 मध्ये वयाच्या 20 व्या वर्षी या मालिकेत आला होता. परंतु 2021 मध्ये त्याने टप्पूची भूमिका सोडली होती.
रिपोर्ट्सनुसार, राज शोमध्ये आल्यापासून दोघेही एकमेकांना डेट करू लागले होते. सेटवर सगळ्यांनाच त्यांच्या अफेअरची माहिती आहे. आता दोघांचा साखरपुडा झाल्याची बातमी पुढे आली आहे.
दोघांकडून मात्र अजूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. काही मीडिया रिपोर्टनुसार ही बातमी समोर आली आहे. त्यामुळे दोघांच्या रिलेशनशिपबाबत सस्पेंस अजूनही कायम आहे.