नागा चैतन्यने समांथासोबतचा शेवटा फोटोही केला डिलीट, पण एक आठवण अजूनही जिवंत; आणखी एका फोटोची का होतेय चर्चा?
नागा चैतन्य आणि समांथा यांच्या घटस्फोटानंतर, नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे. या लग्नाआधी त्याने आपल्या सोशल मीडियावरून समांथासोबतचा शेवटचा फोटो काढला आहे. मात्र एक फोटो अजूनही त्याने काढलेला नाही.
Naga Chaitanya deleted Samantha photo
Follow us on
साऊथ अभिनेता नागा चैतन्य आणि समांथा यांच्या आयुष्याबद्दल, लग्न, घटस्पोटाबद्दल कायम चर्चा सुरु असतात.शिवाय दोघांनी एकत्र यावे अशीही त्यांच्या चाहत्यांची इच्छा होती. मात्र नागा चैतन्य बॉलिवूड अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न करत नव्याने आयुष्याला सुरुवात करणार आहे. त्यावरसुद्धा चाहत्यांनी कमेंट करत हे लग्न न करता समांथा आणि नागा चैतन्यनेच पुन्हा एकत्र यावं अशी इच्छा चाहते व्य़क्त करत होते. मात्र आता या सर्वच चर्चांना पूर्णविराम लागणार आहे. कारण नागा चैतन्यने समांथासोबतच्या सर्व आठवणी पुसून टाकल्या आहेत.
समांथाबरोबरच शेवटची आठवण पुसली
समांथा प्रभूशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य पुन्हा बोहल्यावर चढणार आहे. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाल यांच्या घरी लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. शोभिताशी लग्न करण्यापूर्वी नागा चैतन्यने समांथाबरोबरच शेवटची आठवण पुसून टाकली आहे. नागा चैतन्यने त्याच्या सोशल मीडियावरुन समांथासोबत त्याचा असलेला शेवटचा फोटोही आता डिलीट केला आहे.
Naga Chaitanya deleted Samantha photo
2018 मध्ये नागा चैतन्यने फॉर्मुला 1 रेस ट्रॅकवरचा समांथाबरोबरचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये रेसिंग कारसोबत समांथा आणि नागा चैतन्य दिसत होते. “मिसेस अँड द गर्लफ्रेंड” असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं होतं. घटस्पोटानंतर समंथाने तिच्या सोशल मीडियावरून त्यांचे सर्व फोटोज् डिलीट केले होते मात्र नागा चैतन्यने त्यांच्या दोघांचा तो फोट तसाच ठेवला होता. तो अद्यापपर्यंत त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तसाच होता. मात्र शोभिताशी लग्न करण्यापूर्वी ॉ समांथाबरोबरचा हा शेवटचा फोटो डिलीट केला आहे.
समांथाबरोबरची एक आठवण अजूनही जिवंत
नागा चैतन्यच्या त्यांच्या दोघांचा फोटो डिलीट केला असला तरी इन्स्टाग्राम वॉलवर समांथाबरोबरची आणखी एक आठवण मात्र अजूनही जिवंत आहे. नागा चैतन्य आणि समांथाने ‘माजिली’ या सिनेमात एकत्र काम केलं होतं. जो की त्याच चित्रपटाचा मराठी रिमेक ‘वेड’ हा सिनेमा बनवण्यात आला. तर, या माजिली सिनेमाचं पोस्टर मात्र अद्याप नागा चैतन्यने डिलीट केलेलं नाही. या फोटमध्ये समांथासोबतचा नागा चैतन्यचा फोटो आहे.
लग्नाच्या 4 वर्षानंतर घटस्फोट
काही वर्ष डेट केल्यानंतर नागा चैतन्य आणि समांथाने 2017 साली लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, लग्नानंतर 4 वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. 2021 साली घटस्फोट घेत ते एकमेकांपासून वेगळे झाले. समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य शोभिताला डेट करत होता. 8 ऑगस्टला साखरपुडा करत त्यांनी चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. आता लवकरच नवविवाहीत दाम्पत्य म्हणून चाहत्यांच्या समोर येतीलचं.