Nagarjuna Father: झगमगत्या विश्वात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. पण त्या काही काळानंतर समोर येताच सर्वत्र मोठी खळबळ माजते. आता देखील असंच काही झालं आहे. दाक्षिणात्य सिनेविश्वातील अभिनेते नागार्जुन यांनी नुकताच झालेल्या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडियामध्ये मोठा खुलासा केला आहे. नागार्जुन वडिलांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. नागार्जुन यांचे वडील एएनआर यांनी स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला होता. वडिलांना टोकाचा निर्णय का घेतला… यावर देखील नागार्जुन यांनी मौन सोडलं आहे.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत नागार्जुन यांनी वडिलांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ‘त्या काळात महिलांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण करणं… स्टेजवर सर्वांसमोर उभं राहणं… यासाठी परवानगी नव्हती. म्हणून माझ्या वडिलांनी महिलांची भूमिका करण्यास सुरुवात केली…’
नागार्जुन पुढे म्हणाले, ‘माझे वडील एक रेल्वे स्टेशनवर होते. जेव्हा ट्रेनमध्ये त्यांना प्रसिद्ध निर्माते घंटासला बलरामय्या यांनी पाहिलं आणि म्हणाले चांगले डोळे… चांगलं नाक आहे. तुम्ही अभिनय कराल? असा प्रश्न त्यांनी माझ्या वडिलांना विचारला… त्यानंतर काय झालं सर्वांना माहिती आहे…’
महिलांच्या भूमिका साकारल्यानंतर लोकं माझ्या वडिलांची खिल्ली उडवायचे. याच कारणामुळे अभिनेत्याच्या वडिलांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला होता. ‘लोकं सतत खिल्ली उडवत असल्यामुळे वडील नाराज झाले होते. ते स्वतः म्हणाले होते की, मला आयुष्य संपवायचं आहे… ‘
‘खुद्द वडिलांनी मला सांगितलं होतं, कंबरेपर्यंत पाण्यात माझे वडील समुद्रात गेले होते. पण पाण्यात गेल्यानंतर त्यांनी काय विचार केला माहिती नाही… ते पुन्हा परतले… कठीण परिस्थित त्यांनी स्वतःला सावरलं.’ असं देखील नागार्जुन म्हणाले… सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त नागार्जुन यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.