नागा चैतन्य – समंथा यांच्या घटस्फोटावर महिला मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, प्रकरण अडकणार कायद्याच्या कचाट्यात

| Updated on: Oct 04, 2024 | 12:05 PM

Nagarjuna on Samantha and Naga Chaitanya Divorce: 'एका नेत्यांकडून महिलांना कमीपणा दाखवणं...', नागा चैतन्य - समंथा यांच्या घटस्फोटावर महिला मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, नागार्जुन यांनी मंत्र्याविरोधात घेतला मोठा निर्णय

नागा चैतन्य - समंथा यांच्या घटस्फोटावर महिला मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, प्रकरण अडकणार कायद्याच्या कचाट्यात
Follow us on

Nagarjuna on Samantha and Naga Chaitanya Divorce: अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या घटस्फोटावर वादग्रस्त वक्तव्य करणं तेलंगणाच्या कॅबिनेट मंत्री कोंडा सुरेखा यांना महागात पडलं आहे. कोंडा सुरेखा यांनी नागा चैतन्य आणि समंथा यांच्या घटस्फोटावर अभद्र वक्तव्य केल्यामुळे अभिनेत्याच्या चाहत्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. आता कोंडा सुरेखा यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार असल्याची देखील चर्चा रंगली आहे. नागा चैतन्य याचे वडील नागार्जुन यांनी कोंडा सुरेखा यांच्या विरोधात कोर्टाचा दरवाजा ठोठावणार असल्याचं सांगितलं आहे.

नागा चैतन्य याचे वडील नागार्जुन म्हणाले, ‘मी सध्या विजाग याठिकाणी आहे. पुढील कारवाई करण्यासाठी मी आका हैदराबाद याठिकाणी जात आहे. 100 टक्के कारवाई होणार… हे प्रकरण मी असचं जाऊ देऊ शकत नाही. वकिलांसोबत मी आता जात आहे…’ असं नागार्जुन म्हणाले.

कोंडा सुरेखा यांनी मागितली समंथा हिची माफी

कोंडा सुरेखा यांनी एक्सवर समंथा प्रभू हिची माफी मागितली आहे. ‘माझ्या वक्तव्याचा उद्देश एका नेत्याकडून सतत महिलांना दाखवल्या जाणाऱ्या कमीपणावर आहे… मला कोणाच्या भावनांना ठेच पोहोचवायची नव्हती. समंथा ज्याप्रकारे तू आत्मशक्तीसह उभी राहिली आहेस, तो माझ्यासाठी एक आदर्श आहे. माझ्या वक्तव्यामुळे तुला किंवा तुझ्या चाहत्यांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर, मी माझं वक्तव्य मागे घेते…’ असं कोंडा सुरेखा म्हणाल्या होत्या.

 

 

काय म्हणाल्या होत्या कोंडा सुरेखा?

सोशल मीडियावर सुरेखा यांचा एका व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये कोंडा सुरेखा, बीआरएसचे अध्यक्ष केटी रामाराव यांच्यामुळे नागा चैतन्या आणि समंथा यांचा घटस्फोट झाला आहे.. असं म्हणताना दिसत आहेत. ‘केटीआर यांना अभिनेत्रींचं लैंगिक शोषण करण्याची सवय आहे. त्यांनी अनेक अभिनेत्रींना ड्रग्सची देखील सवय लावली आहे. दोघांचे फोन टॅप केल्यानंतर सर्व काही समोर आलं…’ असं कोंडा सुरेखा म्हणाल्या होत्या.